DC vs LSG Score IPL 2025 : रोमांचक सामन्यात दिल्लीने लखनौचा केला पराभव; आशुतोष शर्मा ठरला विजयाचा हिरो
DC vs LSG Match Updates IPL 2025 : नवीन कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने चमत्कार केला आहे.
LIVE

Background
रोमांचक सामन्यात दिल्लीने लखनौचा केला पराभव
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने 20 षटकांत आठ गडी गमावून 209 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सने 19.3 षटकांत नऊ गडी गमावून 211 धावा केल्या आणि सामना एका गडी राखून जिंकला.
दिल्लीला सहावा धक्का!
दिल्लीला ट्रिस्टन स्टब्सच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. त्याला एम सिद्धार्थने बोल्ड केले. तो 22 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. विप्राज निगम आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
आणखी एक विकेट... दिल्लीचा अर्धा संघ तंबुत
आणखी एक विकेट पडली आहे. यावेळी रवी बिश्नोईने विकेट घेतली. डु प्लेसिसला आऊट केले. तो 29 धावा करून बाद झाला. दिल्लीचा अर्धा संघ तंबुत गेला आहे.
DC vs LSG Live Score IPL 2025 : अक्षर पटेल आऊट
अक्षर पटेलची विकेट पडली आहे, दिग्वेज राठीच्या फिरकीत फसला. 22 धावा केल्यानंतर तो आऊट झाला.
DC vs LSG Live Score IPL 2025 : दिल्लीला पहिल्या 10 चेंडूत 3 धक्के, मॅकगर्क-पोरेलनंतर समीर रिझवीही आऊट
दिल्लीला पहिल्या 10 चेंडूत 3 धक्के बसले आहे, मॅकगर्क-पोरेलनंतर समीर रिझवीही आऊट झाला आहे. दिल्लीला तिसरा धक्का मणिमरन सिद्धार्थने दिला. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात समीर रिझवीला आऊट केले. त्याला फक्त चार धावा करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
