Tamim Iqbal Video: भर मैदानात ह्रदयविकाराचा झटका, मृत्यूशी झुंज देणाऱ्या तमिम इकबालचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, युवराज सिंगही गहिवरला
सोमवारी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान बांगलादेश क्रिकेट संघाचा (Bangladesh Cricket Team) माजी कर्णधार तमीम इक्बाल (Tamim Iqbal) याला हृदयविकाराचा झटका आला आहे.

Tamim Iqbal Health Update : सोमवारी ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामन्यादरम्यान बांगलादेश क्रिकेट संघाचा (Bangladesh Cricket Team) माजी कर्णधार तमीम इक्बाल (Tamim Iqbal) याला हृदयविकाराचा झटका आला आहे. खरंतर, चालू सामना खेळत असताना तमीम इक्बालला (Tamim Iqbal suffers a heart attack) हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल घेऊन जाण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात खेळल्या जाणाऱ्या 50 षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात 36 वर्षीय तमीमने क्षेत्ररक्षण करताना छातीत दुखत असल्याची तक्रार केली. फक्त एक षटक क्षेत्ररक्षण केल्यानंतर त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
तमिम इक्बालची शस्त्रक्रिया झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगनेही तमीमसाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून लवकर बरे होण्यासाठी बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
🚨 Cricket Shocker!
— Cricketik 24×7 (@cricketik247) March 24, 2025
Tamim Iqbal suffers a heart attack during a Dhaka Premier League match today. Wishing him a speedy recovery! 🙏#TamimIqbal #DPL pic.twitter.com/p6YHPu5Du8
तमिमसाठी युवराज सिंगही गहिवरला
युवराज सिंगने तमीमच्या बिघडत्या प्रकृतीबद्दल दुःख व्यक्त केले आणि लिहिले की, 'माझ्या प्रार्थना आणि आशीर्वाद तमीम इक्बाल आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत. लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. खंबीर राहा, चॅम्पियन.
Sending my prayers and wishes to Tamim Iqbal and his family. You’ve faced tough opponents before and come out stronger, this will be no different. Wishing you a speedy recovery. Stay strong, champion @TamimOfficial28
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 24, 2025
खरंतर, तमीम इक्बालला फिल्डिंग करताना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला फजिलातुनेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तमीम इक्बालचा वैद्यकीय अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. खरंतर, तमीम इक्बालने छातीत दुखण्याची तक्रार करताच, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोनुसार, तमीम इक्बालने 50 षटकांच्या सामन्याच्या पहिल्या डावात याची तक्रार केली होती, त्यानंतर वैद्यकीय तज्ञ ताबडतोब पोहोचले.
तमीम इक्बालची आंतरराष्ट्रीय कारकीर्द -
तमिमने या वर्षी जानेवारीमध्ये दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यापूर्वी, जुलै 2023 मध्ये, त्याने भावनिक पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्तक्षेपानंतर 24 तासांत त्याने आपला निर्णय बदलला. तमीम शेवटचा बांगलादेश संघाकडून 2023 मध्ये खेळला होता. त्याने 70 कसोटी सामन्यांमध्ये 5134 धावा आणि 243 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,357 धावा केल्या. याशिवाय, त्याने 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,758 धावा केल्या आहेत.





















