Special Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवर
Special Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवर
नागपूरच्या दंग्यानंतर सरकार, पोलीस, प्रशासन, महानगरपालिका सगळी यंत्रणा सक्रीय झाली..ज्या हातांनी पोलिसांवर हल्ले केले, नागपूरच्या रस्त्यावर हिंसाचार करत धुडगूस केला, त्यातल्या महत्वाच्या आरोपींची कुंडली काढली गेली.. यातल्या काही दंगेखोरांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवला.. या कारवाईनंतर नेत्यांमध्येही दोन गट पडले आहेत.. सत्ताधाऱ्यांनी याचं समर्थन केलं तर विरोधकांनी एकतर्फी कारवाईचा आरोप केला.
काय घडलं नागपुरात आज.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
नागपूरातील मोमीनपुरा, महाल भागातील जोहरीपूर आणि संजय बाग कॉलनी परिसरात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त होता.
याचं कारण होतं
नागपूर हिंसाचार प्रकरणात महानगर पालिकेची धडक कारवाई केली.
दंगेखोरांच्या अतिक्रमणावर पालिकेचा हाथोडा चालला.
फहीम खान आणि युसुफ शेख या दोन आरोपीच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केली गेली तर शाहीन अमीन या आरोपीचे दोन दुकानं सील करण्यात आली.
या कारवाईत मुस्लिमांना जाणीवपूर्वक टारगेट केलं जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केला आहे. त्याला अमोल मिटकरींचीही साथ मिळाली आहे.






















