एक्स्प्लोर

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक

Chhattisgarh Naxal Encounter : जवानांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात शोध सुरू आहे.

Chhattisgarh Naxal Encounter : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत 12 नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईत दोन जवान हुतात्मा झाले असून दोन जखमी आहेत. दरम्यान, कारवाईची तीव्रता पाहता ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त अभियान सुरु आहे. 

मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त 

जवानांनी सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही जखमी जवानांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांना उत्तम उपचारासाठी उच्च केंद्रात पाठवण्यात येणार आहे, यासोबतच बॅकअपसाठी अतिरिक्त फौजफाटाही घटनास्थळी पाठवण्यात आला आहे.

नक्षलवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर फोर्स घटनास्थळी रवाना करण्यात आला. विजापूर डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले. डीआयजी कमलोचन कश्यप यांनी सांगितले की, सैनिकांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही. हे एक मोठे ऑपरेशन आहे. आकडा स्पष्टपणे सांगता येणार नाही, मात्र नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नक्षलवाद्यांच्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

2 फेब्रुवारी रोजी 8 नक्षलवादी मारले गेले

2 फेब्रुवारी रोजी विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले होते. मारले गेलेले सर्व माओवादी हे पुरुष नक्षलवादी होते. सुमारे 800-1000 सुरक्षा दलाच्या जवानांनी पीएलजीए कंपनी क्रमांक 2 च्या नक्षलवाद्यांना घेरले होते. त्यात मोठे नेते होते. पथकाने घटनास्थळावरून INSAS, 303, 12 बोअर, BGL लाँचर जप्त केले.

20 दिवसांपूर्वी गरिआबंदमध्ये 16 नक्षलवादी ठार झाले होते

20-21 जानेवारी रोजी गरीबीबंद जिल्ह्यातील जंगलातही चकमक झाली. सुमारे 80 तास चाललेल्या या कारवाईत 16 नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी 12 नक्षलवाद्यांवर एकूण 3 कोटी 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य चालपती यांचाही समावेश आहे. एकट्या चालपाठीवर 90 लाखांचे बक्षीस होते. नुआपाडा-गारियाबंद-धमतरी विभाग समितीचे प्रमुख सत्यम गावडे हेही चकमकीत मारले गेले.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget