OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT Web Series: ओटीटीवर एक नवी वेब सीरिज आली आहे, जी रिलीज होताच ट्रेंड करत आहे. या वेब सीरिजनं सध्या धुमाकूळ घातला आहे. ओटीटीवर ट्रेंड करत असलेल्या कोरियन ड्रामाला IMDb कडून सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.

OTT Web Series: एक असा रोमॅन्टिक ड्रामा (Romantic Drama), ज्यामध्ये ग्लॅमर नाही, शिवीगाळ किंवा अश्लील भाषा नाही आणि कोणतीही अॅक्शन किंवा थ्रील नाही. तरीही तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर बक्कळ कमाई करत आहे. आज आम्ही तुम्हाला ओटीटीवरील एका के-ड्रामाबाबत सांगणार आहोत, जे सध्या ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेला हा रोमॅन्टिक ड्रामा, तुम्ही पाहू शकता.
ओटीटीवर एक नवी वेब सीरिज आली आहे, जी रिलीज होताच ट्रेंड करत आहे. या वेब सीरिजनं सध्या धुमाकूळ घातला आहे. ओटीटीवर ट्रेंड करत असलेल्या कोरियन ड्रामाला IMDb कडून सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे. सर्वात आधी क्वीन ऑफ टियर्स आणि स्क्विड गेम्स हे दोन हाईएस्ट रेटेड ड्रामा (Highest Rated K Drama) होता, पण आता या दोन्ही सीरिजची जागा दुसऱ्या एका सीरिजनं बळकावली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सीरिजमध्ये ग्लॅमर नाही, शिवीगाळ किंवा अश्लील भाषा नाही आणि ना कोणताही अॅक्शन थ्रील. या साध्या, सरळ स्टोरी असणाऱ्या के-ड्रामानं सर्वांना अक्षरशः वेड लावलं आहे.
व्हेन लाईफ गिव्ह्स यू टेंजेरिन्स (When Life Gives You Tangerines) असं या के-ड्रामाचं नाव आहे. हा के-ड्रामा आपल्याला शिकवतो की, तुम्हाला तुमच्या पार्टनरला स्पेशल फिल करुन देण्यासाठी कोणत्याही चंद्राची किंवा ताऱ्यांची गरज नाही. कोणतंही आलिशान घर खरेदी करण्याची गरज नाही, किंवा लग्झरी कारमध्ये फिरवण्याचीही गरज नाही. तुम्ही त्यांची काळजी घेऊन तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
सीरिजमध्ये नेमकं दाखवलंय तरी काय?
सीरिजची कथा अत्यंत साधी आणि सोपी आहे. लहान-सहान गोष्टींमार्फत प्रेम जाहीर केलं जाऊ शकतं. ही सीरिज चार सीझन्समध्ये सादर करण्यात आली आहे. किम वोन सियोक (Kim Won Seok)नं एक-एक सीन अगदी सुंदर पद्धतीनं शूट केला आहे. 50s पासून 2000s पर्यंत सेट सीरिजची कहाणी तुम्हाला अक्षरशः बांधून ठेवते.
खऱ्या प्रेमाची सुंदर कथा
व्हेन लाईफ गिव्ह्स यू टेंजेरिन्स या कथेला अनेक आकार आहेत. ही कथा तुम्हाला ए-शिन आणि ग्वान सिक यांच्यातील अतूट प्रेम दाखवेल, तर ती तुम्हाला वडील-मुलगी आणि आई-मुलीच्या नात्यात खोलवर घेऊन जाईल. ही कथा ए-सिन नावाच्या मुलीपासून सुरू होते, जिला मोठं झाल्यावर कवी बनण्याची इच्छा आहे. लहानपणापासूनच ग्वान सिक नावाच्या मुलाला ती आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं असतं. रोमान्स आणि सस्पेन्सनं भरलेली ही कथा लिम सांग चून यांनी लिहिली आहे.
कुठे पाहाल सीरिज?
व्हेन लाईफ गिव्ह्स यू टँजेरिन्स ही 16 पार्ट्सची सीरिज सध्या नेटफ्लिक्सवर (Netflix) स्ट्रीम होत आहे. 7 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या मालिकेचे आतापर्यंत 12 भाग प्रदर्शित झाले आहेत. उर्वरित 4 भाग 28 मार्च रोजी प्रदर्शित होतील. त्याच्या रेटिंगबद्दल बोलायचं झालं तर, हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेट केलेला के-ड्रामा आहे ज्याला IMDb कडून 9.2 रेटिंग मिळाले आहे. यापूर्वी, सर्वाधिक रेटिंग मिळालेल्या के-नाटकांमध्ये स्क्विड गेम (8.5), क्वीन ऑफ टीयर्स (8.2) आणि लवली रनर (8.6) यांचा समावेश होता.
पाहा ट्रेलर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
