एक्स्प्लोर
Dharavi Fire : धारावीत गॅस सिलेंडर भरलेल्या गाडीचा स्फोट, भीषण आगीचा लोट
धारावीमध्ये चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाला असून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

धारावीमध्ये चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाला असून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
1/8

मुंबईच्या धारावीमध्ये सिलेंडरचे स्फोट झाले असून भीषण आग लागली आहे. स्फोटाचे चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे.
2/8

धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत आग लागल्याने हे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
3/8

या सिलेंडरचा स्फोट भीषण असून त्या ठिकाणी मोठी आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
4/8

धारावी डेपोच्या रस्त्यावर ही कॉलनी असून या ठिकाणी पोलिस प्रशासनही पोहोचले आहे.
5/8

मुंबई महापालिकेने ही आग लेव्हल टू या प्रकाराची असल्याची माहिती दिली आहे.
6/8

सिलेंडरने भरलेली ही गाडी कुणाची आहे आणि धारावीसारख्या गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यावर ही गाडी का लावण्यात आली होती याचा तपास सुरू आहे.
7/8

धारावीचा हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे. त्यामुळे या आगीमागे काही घातपात आहे का याचा तपास केला जात आहे.
8/8

अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. या स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे संपूर्ण धारावीकर रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे.
Published at : 24 Mar 2025 10:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
