Dharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!
Dharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!
धारावीमध्ये चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाला असून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईच्या धारावीमध्ये सिलेंडरचे स्फोट झाले असून भीषण आग लागली आहे. स्फोटाचे चार ते पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे.
धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत आग लागल्याने हे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
या सिलेंडरचा स्फोट भीषण असून त्या ठिकाणी मोठी आग लागली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
धारावी डेपोच्या रस्त्यावर ही कॉलनी असून या ठिकाणी पोलिस प्रशासनही पोहोचले आहे.
मुंबई महापालिकेने ही आग लेव्हल टू या प्रकाराची असल्याची माहिती दिली आहे.
सिलेंडरने भरलेली ही गाडी कुणाची आहे आणि धारावीसारख्या गर्दीच्या ठिकाणच्या रस्त्यावर ही गाडी का लावण्यात आली होती याचा तपास सुरू आहे.























