डेव्हिड वॉर्नरची लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर लाँच; इव्हेंटमध्ये श्रीलीलासोबतही थिरकला
David Warner dances with sreeleela : रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर लाँच; डेव्हिड वॉर्नर इव्हेंटमध्ये श्रीलीलासोबतही थिरकला

David Warner dances with sreeleela : दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला आणि अभिनेता नितीन यांचा बहुचर्चित रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला (robinhood trailer launched) आलाय. दरम्यान, या ट्रेलरच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेतोय. डेव्हिड वॉर्नरच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधलंय. रॉबिनहूड ट्रेलरच्या लॉन्चवेळी अभिनेते, चित्रपटाचे निर्माते आणि सिनेमाशी संबंधित सर्व लोक उपस्थित होते. यावेळी डेव्हिड वॉर्नर देखील सामील झाला होता.
View this post on Instagram
डेव्हिड वॉर्नरचा या ट्रेलरमध्ये हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताना कूल लूक बाहेर पडलाय. श्रीलीला आणि नितीन यांचा हा मेगा बजेट सिनेमा हे. दरम्यान, ट्रेलर लॉन्चवेळी(robinhood trailer launched) सर्व स्टार कास्टने डान्स केलेले पाहायला मिळाला. डेव्हिड वॉर्नर श्रीलीला आणि नितीनसोबत थिरकताना दिसलाय. निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये डेव्हिड नितीन आणि श्रीलीलासोबत डान्स करताना दिसत आहे.
क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर त्याच्या तेलुगु सिनेमातील पदार्पणाच्या सिनेमाचे म्हणजेच 'रॉबिन हूड'चे प्रमोशन करत आहे. त्याने 'रॉबिन हूड' मधील एका गाण्यावर नितिन आणि श्रीलीलासह संपूर्ण स्टारकास्टसह डान्स केला, एवढेच नाही तर 'रॉबिन हूड'च्या कलाकारांनी स्टेजवर एकत्र नाचताना वॉर्नरला त्याच्या चित्रपटातील 'आधी धा सरप्रिसु' गाण्याची हुक स्टेप देखील शिकवली. 'रॉबिन हूड' ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरचा आनंद गगनात मावत नव्हता. या खास प्रसंगी निर्मात्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल प्ले केले, ज्यामध्ये वॉर्नरचे सनरायझर्स हैदराबादसाठी गेल्या काही वर्षांतील योगदान दाखवले गेले.
View this post on Instagram
डेव्हिड वॉर्नरच्या रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर लॉन्च
Video : Robinhood – Adhi Dha Surprisu Song (Ketika Sharma, Nithiin, Sreeleela)
इतर महत्त्वाच्या बातम्या























