Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलं
मुंबईच्या रस्त्यांसंदर्भातली बैठक ... बैठकीला आदित्य ठाकरेंची उपस्थिती शिंदे मात्र दालनाबाहेरुनच परतले ... मुंबईच्या रस्त्यांसंदर्भातली बैठक ...ठक सुरु झाल्यानंतर तासाभराने शिंदेंची हजेरी सीन तीन मुंबईच्या रस्त्यांसंदर्भातली बैठक शिंदे बैठकीसाठी दाखल होताच सर्व आमदार उभे राहिले पण आदित्य ठाकरे बसूनच राहिले ..शिंदेंकडे आदित्य ठाकरेंचा कटाक्ष पण आदित्य ठाकरेंशी नजरानजर टाळत शिंदेंचा इतर आमदारांशी संवाद सिनेमातले सीन नसले तरी सिनेमापेक्षा कमी ड्रामा तर नक्कीच नाही.. हा पॉलिटीकल ड्रामा घडलाय एका बैठकीत बैठक होती मुंबईतील रस्त्यांच्या कामासंदर्भातील पण या बैठकीपेक्षा चर्चा रंगलीये ती शिंदे आणि आदित्य ठाकरेंच्या बॉडी लॅग्वेजची रस्ते बैठकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आले तसा शिंदेंना बैठकीला येण्यासाठी तासभर उशिरच झाला खरं तर शिंदे बैठकीसाठी वेळेतच आले होते पण मग त्यांना सभागृहाचं कामकाज असल्याचं लक्षात आलं आणि ते दालनाबाहेरुनच निघून गेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची परवानगी घेऊन शिंदेंनी बैठकीकडे पाठ फिरवली दुसरीकडे आदित्य ठाकरेंसह इतर आमदार मात्र शिंदेंची प्रतीक्षा करत होते शेवटी शिंदेंशिवाय बैठक सुरु झाली तासाभराने एकनाथ शिंदे बैठकीसाठी दाखल झाले शिंदे येताच सर्व आमदार उठून उभे राहिले पण आदित्य ठाकरे मात्र तिथेच बसून राहिले पुढे शिंदेंनी बोलायला सुरुवात केली वाटलं आदित्य ठाकरे त्यांच्याकडे बघणारच नाहीत पण तसं नाही झालं आदित्य ठाकरे पापणी न पाडता शिंदेंकडे बघत होते... शिवसैनिकांच्याच भाषेत बोलायचं झालं तर आदित्य जणू खुन्नसच देत होते... पण शिंदेंनी मात्र नजरानजर टाळली हा सगळा ड्रामा माध्यमांच्या नजरेतून सुटला नाही शिंदेंचं बोलणं शांतपणे ऐकून घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनी बैठक संपताच शिंदेंवर आगपाखड केली






















