एक्स्प्लोर
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. आधार कार्ड, कोर्टाच्या नोटिसा, बँक चेकसह महत्त्वाची कागदपत्रे कर्मचाऱ्यांनी उघड्यावर फेकल्याचे दिसून आले आहे.

Nandurbar News
1/7

नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार उघड झाला आहे.
2/7

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी तब्बल दीड हजाराहून अधिक आधार कार्ड उघड्यावर फेकले आहेत. तसेच पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रांचे वाटप न करता ते देखील फेकून दिले आहेत.
3/7

कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे उघड झाले आहेत. आधार कार्ड, कोर्टाच्या नोटिसा, बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे उघड्यावर फेकल्याचे पाहायला मिळत आहे.
4/7

यामुळे पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा समोर आला आहे.
5/7

गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिसमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
6/7

एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागतं, मात्र पोस्टामार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
7/7

या घटनेनंतर पोस्टाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
Published at : 09 Feb 2025 01:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
राजकारण
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
