Ajit Pawar Majha Vision : मुलीचा वाढदिवस होता तर कशाला कोर्टात गेली? सुप्रिया सुळे यांना टोला!
Ajit Pawar Majha Vision : मुलीचा वाढदिवस होता तर कशाला कोर्टात गेली? सुप्रिया सुळे यांना टोला!
कोर्टाची पायरी कुणामुळे चढावी लागली असा सवाल उपस्थित करताना राष्ट्रवादी शरद पवारांचा (Sharad Pawar) रोख अजित पवारांकडे (Ajit Pawar) होता. तसंच मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जावं लागलं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती. माझा व्हिजन कार्यक्रमात अजित पवारांनी दोघांनाही प्रत्युत्तर दिलंय. मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जायची गरज काय होती? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला आहे. तसंच सहानुभूती मिळवण्यासाठी हे कोर्टात गेले का असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले, सुप्रिया नेहमी सांगते माझ्या मुलीचा वाढदिवस होता तरी मला कोर्टात जावे लागले.पण वाढदिवस करायचा कोर्टात कशाला गेली? त्यादिवशी कोर्टात नव्हते जायचे किंवा वकिलाला सांगायचे माझ्या मुलीचा वाढदिवस आहे पुढची तारीख दे...हे भावनिक करणे चांगले नाही.. रेवती पण माझी मुलगी आहे पण माझ्या मुलीचा वाढदिवस होता तिथे बसले तिथे तिला यायला सांगितले, असे नका करू, ठीक आहे माझी मत वेगळी तुमची मत वेगळी... मी कोणालाचा कोर्टात जायला सांगितले नाही मी स्वत कोर्टाची पायरी चढली नाही. मी वकिलाला पैसे देतो त्याने माझी बाजू मांडली पाहिजे.