Sunil Gavaskar Birthday: 72 वर्षांचे झाले लिटल मास्टर, सुनील गावस्करांचे 'हे' विक्रम अजूनही अबाधित!
Sunil Gavaskar Birthday: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक अशी ओळख असलेले लिटल मास्टर सुनील गावस्कर आज 72 वर्षांचे झाले आहेत.
Sunil Gavaskar Birthday:भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक अशी ओळख असलेले लिटल मास्टर सुनील गावस्कर आज 72 वर्षांचे झाले आहेत. सुनील गावस्कर हे कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे जगातील पहिले फलंदाज ठरले होते. ते 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य देखील होते.
सुनील गावस्कर एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी दोन मैदानावर सलग चार शतकं ठोकली आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आणि वेस्ट इंडीजच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सुनील गावस्कर यांनी सलग चार शतकं केली आहेत. सुनील गावस्कर यांना त्यांच्या शानदार कामगिरीमुळं 1980 मध्ये विस्डेन प्लेअर ऑफ द ईअर पुरस्कार मिळाला होता. सुनील गावस्कर यांच्या नावे आजही एका मालिकेत सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम अबाधित आहे. सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध एका मालिकेत 774 धावा केल्या होत्या.
Harleen Deol : सुप्परवुमन...! सामना गमावला पण हरलीननं जिंकली मनं, अफलातून झेलचं होतंय कौतुक!
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सुनील गावस्कर यांनी दोन खणखणीत माईलस्टोन पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील 10 हजार धावा आणि 34 शतके. गावस्करांनी 100 हून अधिक वनडे सामनेही खेळले असले तरी गावस्करांची करिअर साकारली त्या काळात कसोटी क्रिकेटचंच गारुड सर्वांवर होतं. कसोटी क्रिकेट हेच अस्सल आणि खरं क्रिकेट असं मानणारा तो काळ होता.
BLOG | 'क्रिकेट पन्नाशी'तले लिट्ल मास्टर!
ज्या काळात मार्शल, रॉबर्टस, होल्डिंग, ओल्ड, अरनॉल्ड, विलीस, बॉथम, लिली, थॉमसन, इम्रान खान, सरफराज नवाझ, सर रिचर्ड हॅडली यासारखे तोफखाने आग ओकत. एकेका स्पेलमध्ये समोरच्या टीमच्या बॅटिंगचा पालापाचोळा करत. त्या गोलंदाजांसमोर गावस्कर सलामीला येऊन भारतीय धावसंख्येची मूळं मजबूत करत. फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर हेल्मेटविना खेळताना, कधी फक्त स्कल कॅपचा आधार घेताना गावस्कर या निखाऱ्यावरुन चाललेत. त्यांनी 10 हजार 122 धावा आणि 34 शतकांची वेस पार केलीय.
वेगवान गोलंदाजीसमोर कणखरपणे उभं राहून खोऱ्याने धावा करता येतात, हे गावस्करांच्या दस हजारी परफॉर्मन्सने प्रूव्ह केलंय. त्या शाखेतून मग द्रविड, लक्ष्मण, पुजारासारखे संयमी, क्लासी फलंदाज तर जन्मलेच. शिवाय सचिन, कोहली यांच्यासारखे चॅम्पियनही उदयाला आले. ज्यांचा बचाव हा आक्रमणाइतकाच वरच्या दर्जाचा आहे. फलंदाजीसोबतच उत्तम कॅचेस घेणारे क्षेत्ररक्षक म्हणूनही गावसकरांचा लौकिक राहिलाय.
निवृत्त झाल्यानंतर समालोचनातून, स्तंभलेखनातून गावस्कर यांच्या क्रिकेटमधील सखोल ज्ञानाचं दर्शन घडत असतं. कधी भारतीय खेळाडूंच्या खटकलेल्या गोष्टींवर परखडपणे बोट ठेवत तर कधी परदेशी माजी खेळाडूंच्या शेरेबाजीवर आपल्या खास शैलीत टोलेबाजी करत गावस्करांनी अनेकांची तोंडं बंद केलीयेत. त्यांची कॉमेंट्री ऐकणं हा एक श्रवणीय अनुभव असतो. म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजीचं विद्यापीठ असलेले गावस्कर जणू त्या त्या मॅच सिच्युएशनवर बोलत असतात, तेव्हा क्रिकेटचा सोप्या भाषेतील क्लासच सुरु आहे, असं वाटतं.