Harleen Deol : सुप्परवुमन...! सामना गमावला पण हरलीननं जिंकली मनं, अफलातून झेलचं होतंय कौतुक!
Harleen Deol Catch Video: हरलीन देओलनं घेतलेल्या भन्नाट कॅचची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅमी एलेन जोन्सनचा हरलीननं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
ENG-W vs IND-W 1st T20 Harleen Deol : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात महिला टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात महिला टीम इंडियाला पराभव जरी स्वीकारावा लागला असला तरी संघाच्या क्षेत्ररक्षणामुळं मात्र खेळाडूंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यातल्या हरलीन देओलनं घेतलेल्या भन्नाट कॅचची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅमी एलेन जोन्सनचा हरलीननं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ (Harleen Deol Catch Video) जोरदार व्हायरल झालाय. शिखा पांड्येच्या गोलंदाजीवर अॅमी एलेन जोन्सननं जोरदार फटका मारला. हा चेंडू सीमापार जाणार असं वाटत असतानाच तिथं चपळाईनं पोहोचलेल्या हरलीन देओलने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजरा दाखवत अफलातून झेल पकडला. हवेत सूर मारुन तिनं पकडलेला हा कॅच चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं देखील हरलीनच्या या कॅचचं कौतुक केलं आहे. त्यानं हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की, हा जबरदस्त कॅच आहे. हा माझ्यासाठी कॅच ऑफ द ईअर आहे, असं सचिननं म्हटलं आहे.
That was a brilliant catch @imharleenDeol. Definitely the catch of the year for me!pic.twitter.com/pDUcVeOVN8
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 10, 2021
The result didn't go our way today but here is something special from the game.@ImHarmanpreet | @imharleenDeol #TeamIndia
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2021
🎥: @SonySportsIndia pic.twitter.com/E1lMmPZrYR
OMG 😱 🤯🤯@imharleenDeol take a bow!! Calling it now the best we will see this series!! pic.twitter.com/O4Dwm4OYlU
— Lisa Sthalekar (@sthalekar93) July 9, 2021
ENG W vs IND W 1st T20 : पहिल्या टी20 सामन्यात भारतीय महिला संघाचा 18 धावांनी पराभव
डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्यात आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर इंग्लंड महिला संघाला 18 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले. या विजयासह इंग्लंड महिला संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
1st T20I. It's all over! England Women won by 18 runs (DLS Method) https://t.co/ekChhFVeIV #ENGvIND
— BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2021
त्याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने नॅटली स्कायवर 55 (27) आणि अॅमी एलेन जोन्स 47 (27) यांच्या तडाखेबाज फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 7 विकेट्स गमावत 177 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्ट आणि डॅनियल वॅट या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. डॅनियल वॅटला 31 धावांवर बाद झाली तर टॅमी ब्यूमॉन्टने 18 धावांचे योगदान दिले. इंग्लंडची कर्णधार अवघ्या सहा धावांवर बाद झाली. महिला टीम इंडियाकडून शिखा पांडेनं तीन तर राधा यादव आणि पूनम यादवनं एक एक विकेट घेतली.
इंग्लंडने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा शून्यावरच परतली नंतर आलेल्या हरलीन देओलसह स्मृती मानधनाने संघाचा डाव सावरला. दोघींनी पहिल्या दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. नंतर स्मृती मानधना 17 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 29 धावा करुन बाद झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौर केवळ एका धावेवर बाद झाली. यानंतर खेळादरम्यान पावसानं हजेरी लावली. पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड महिला संघाला 18 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत इशांतच्या जागी सिराज, Playing 11मध्ये आणखी 'हे' बदल?