(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sania Mirza : 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, कसं राहिलं सानियाचं करिअर
Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं मंगळवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं मंगळवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. या सामन्यात सानियाला पराभवाला सामोरे जावे लागले. डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत सानिया आणि तिची जोडीदार मॅडिसन कीज यांना पराभवाचा सामना करावा लागला. व्हर्नोकिया कुडेरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांनी 4-6, 0-6 असा पराभव केला. सानिया मिर्झाने नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि हा तिच्या व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. सानिया मिर्झानं आपल्या टेनिस करिअरमध्ये भारताचं नाव शिखरावर पोहचवलं आहे. सानियाच्या नावावर सहा दुहेरी गँडस्लॅमची नोंद आहे. त्याशिवाय आपल्या करिअरमध्ये सानियानं अनेक विक्रमला गवसणी घातली आहे. सानियाच्या कारकिर्दीवर एक नजर ....
भारतातील सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू
सानिया मिर्झाने पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या माध्यमातून खेळली होती. पदार्पणाच्या सामन्यात तिने विजय मिळवला. या ग्रँडस्लॅममध्ये तिने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. यानंतर, यूएस ओपन 2005 मध्ये तिने महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. 2005 मध्येच सानियाने पहिली एकेरी WTA टूर विजेतेपद पटकावले, अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी तिला टॉप-50 क्रमवारीत स्थान मिळवण्यात यश आले. तिची WTA न्यूकमर ऑफ द इयर देखील निवड झाली. याआधी टेनिस विश्वात कोणत्याही भारतीय खेळाडूला हे स्थान मिळाले नव्हते. येथून सानिया मिर्झाने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने एकेरी आणि दुहेरीचे सामने जिंकत राहिले. तिने बॅक टू बॅक WTA दुहेरी विजेतेपदं जिंकली आणि ग्रँड स्लॅममध्येही आपला ठसा कायम ठेवला. 2007 मध्ये, ती WTA एकेरी क्रमवारीत 27 व्या स्थानावर होती. सानियाने तिच्या कारकिर्दीत एक एकेरी WTA आणि 43 दुहेरी WTA विजेतेपद पटकावली.
6 दुहेरी ग्रँडस्लॅम खिशात
2009 मध्ये सानियाने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली. यानंतर त्याने फ्रेंच ओपन 2012 आणि यूएस ओपन 2014 मध्ये मिश्र दुहेरीतही विजेतेपद पटकावले. यानंतर तिचे अधिक लक्ष महिला दुहेरीवर गेले. 2015 मध्ये, सानियाने विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती. अशाप्रकारे त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 6 दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. सानिया मिर्झाने प्रथमच महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला. 13 एप्रिल 2005 रोजीच तिनी हे स्थान मिळवले. ती तब्बल 91 आठवडे टॉपवर राहिली होती.
Welcome to retirement @MirzaSania you outdid yourself time and time again both on and off the court …. Proud of you !! pic.twitter.com/xNzIykOIqH
— Mahesh Bhupathi (@Maheshbhupathi) February 21, 2023