(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sania Mirza: टेनिस कारकिर्दीचा शेवट पराभवाने, दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेत सानिया मिर्झाचा पराभव, पहिल्या फेरीतून बाहेर
Sania Mirza Retires: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
Sania Mirza last Match: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. डब्ल्यूटीए दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत सानिया आणि तिची जोडीदार मॅडिसन कीजला सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या जोडीचा व्हर्नोकिया कुडेरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोव्हा यांनी 4-6, 0-6 असा पराभव केला. सानिया मिर्झाने नुकतीच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि हा तिच्या व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटचा सामना होता.
Sania Mirza last Match: सानियाच्या जोडीचा पराभव
दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिप सुरू असून त्यामध्ये भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिची अमेरिकन जोडीदार मॅडिसन कीजसोबत सहभाग घेतला होता. त्यांचा सामना व्हर्नोकिया कुडरमेटोवा आणि ल्युडमिला सॅमसोनोवा या बलाढ्य रशियन जोडीशी झाला. या सामन्यात सानिया आपल्या खेळाची जादू दाखवून हा सामना जिंकेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण सर्वांचा भ्रमनिराश झाला आणि पहिल्या फेरीतच सानियाला 4-6, 0-6 असा पराभव स्वीकारावा लागला. सानियाचा हा शेवटचा सामना तासभर चालला.
First Indian woman to win a WTA title ✔️
— TENNIS (@Tennis) February 21, 2023
First Indian woman to win a Grand Slam title ✔️
First Indian woman to become No. 1 ✔️
🇮🇳 @MirzaSania, who played the last match of her career today in Dubai, created A LOT of history over the last two decades: https://t.co/FQL56yqcyK
भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू
2009 मध्ये सानियाने कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. ती ऑस्ट्रेलियन ओपन 2009 मध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीची चॅम्पियन बनली. यानंतर त्याने फ्रेंच ओपन 2012 आणि यूएस ओपन 2014 मध्ये मिश्र दुहेरीतही विजेतेपद पटकावले. 2015 मध्ये, सानियाने विम्बल्डन आणि यूएस ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावण्यात ती यशस्वी ठरली होती. सानिया मिर्झाने प्रथमच महिला दुहेरीत प्रथम क्रमांक पटकावला. 13 एप्रिल 2005 रोजीच तिनी हे स्थान मिळवले. ती तब्बल 91 आठवडे टॉपवर राहिली होती. अशाप्रकारे त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 6 दुहेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. याशिवाय 13 एप्रिल 2005 रोजी सानियाने प्रथमच महिला दुहेरीत प्रथम क्रमांक मिळवला. दुबई ड्युटी फ्री चॅम्पियनशिप हा सानियाचा शेवटचा सामना होता.
ही बातमी वाचा: