एक्स्प्लोर
Champions Trophy 2025: 8 पैकी 2 संघांचे आव्हान संपुष्टात, 2 संघ उपांत्य फेरीत; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत 4 संघात चुरशीची लढाई
Champions Trophy 2025: न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला.

Champions_Trophy_2025
1/9

न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला.
2/9

न्यूझीलंडच्या या विजयासह 'अ' गटातून भारताचीही उपांत्य फेरीत आगेकूच झाली असून, बांगलादेश आणि यजमान पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
3/9

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 236 धावा केल्या.
4/9

पाकिस्तानला स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, दुसऱ्या सामन्यातही भारताने त्यांना पराभूत केले. पाकिस्तान संघाच्या आशा बांगलादेशकडून होत्या, पण बांगलादेश संघ न्यूझीलंडकडून पराभूत झाला.
5/9

रावळपिंडीमध्ये न्यूझीलंडने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला. यासह, पाकिस्तान आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडले.
6/9

ग्रुप बी मधून 4 संघांपैकी 2 संघ उपांत्य फेरीत दाखल होईल.
7/9

ग्रुप बीमध्ये अजूनही खूप चुरशीची लढाई सुरु आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. तथापि, अद्याप कोणीही उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केलेले नाही.
8/9

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 236 धावा केल्या.
9/9

प्रत्युत्तरात, न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रच्या 112 धावांच्या शानदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 46.1 षटकांत लक्ष्य पूर्ण केले. रॅचिन व्यतिरिक्त टॉम लॅथमनेही अर्धशतक झळकावले. त्याने 55 धावांची खेळी खेळली.
Published at : 25 Feb 2025 07:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion