(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : रिंकू सिंहच्या लग्नात शाहरुख करणार डान्स, कोलकात्याच्या फिनिशरने केला खुलासा
Rinku Singh : पाच चेंडूवर पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने देशभरात नाव कमावले.
Shah Rukh Khan Promised To Rinku Singh : पाच चेंडूवर पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने देशभरात नाव कमावले. रिंकू सिंह याने वादळी फटकेबाजी करत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला होता. या विजयानंतर कोलकात्याचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानेही रिंकू यांचे कौतुक करत सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. रिंकू सिंह याच्या लग्नाला शाहरुख खान जाणार आहे. रिंकू सिंह याने स्वत: याबाबतची माहिती दिली. रिंकू सिंह याने सांगितले की, शाहरुख खानने लग्नाला येण्याचा आणि लग्नात डान्स करणार असल्याचे अश्वासन मला दिलेय.
रिंकू सिंहच्या लग्नाला जाणार शाहरुख खान -
गुजरात टायटन्सविरोधातील सामन्यात यश दयालच्या षटकात रिंकू सिंह याने पाच चेंडूवर पाच षटकार लावत कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यानंतर शाहरुख खान याने आपल्या ट्वीटरवरुन रिंकूसाठी खास पोस्ट लिहिली होती आता शाहरुख खान रिंकू सिंह याच्या लग्नाला जाणार आहे. त्याशिवाय लग्नात शाहरुख खान नाचणारही आहे. कोलकाता आणि आरसीबीच्या सामन्यानंतर रिंकू सिंह याने याबाबतचा खुलासा केला. गुजरातविरोधातील सामन्यानंतर शाहरुख खान याने रिंकूसोबत बातचीत केली होती. रिंकू म्हणाला की, शाहरुख खान माझ्या लग्नाबाबत बोलत होते. शाहरुख खान यांनी माझ्या लग्नाला येणार असल्याचे सांगितलेय. त्याशिवाय ते लग्नात डान्सही करणार आहेत.
When SRK Called Rinku Singh!#ShahRukhKhan𓀠 #RinkuSingh pic.twitter.com/rC2Ki7eHwl
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) April 27, 2023
रिंकूची दमदार कामगिरी -
यंदाच्या हंगामात रिंकू सिंह याने दमदार कामगिरी केली आहे. रिंकू याने विस्फोटक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. रिंकूच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने गुजरातविरोधात रोमांचक विजय मिळवला होता. रिंकू याने आतापर्यंत आठ सामन्यात 62.75 च्या सरासरीने आणि 158.86 च्या स्ट्राईक रेटने 251 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रिंकू सिंह याने आतापर्यंत 15 चौकार आणि 18 षटकार लगावले आहेत. त्याशिवाय फिल्डिंग करतानाही पाच जबरदस्त झेल घेतले आहेत.
Lord Rinku Singh in IPL 2023
— KKR Bhakt 🇮🇳 ™ (@KKRSince2011) April 26, 2023
•Most Runs by a Middle order batsman
•Best Average in the Middle Order
•Most Sixes by an Indian (18)
•Strike Rate of 155+
A Superstar has been borned at KKR again🦁 pic.twitter.com/7A5Ayb7RYO
Rinku singh! 🔥#RinkuSingh #KKR #cricketTwitter pic.twitter.com/MH5qDDX096
— RVCJ Sports (@RVCJ_Sports) April 27, 2023