FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
फुटबॉल विश्वचषकाचा शेवटचा हंगाम 2022 मध्ये कतारमध्ये झाला होता. तो अर्जेंटिनाने जिंकला. या संघाने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला.
FIFA World Cup 2034 : 2034 च्या विश्वचषकाच्या आयोजनासाठी फक्त सौदी अरेबियाने बोली लावली होती. अशा परिस्थितीत झुरिचमध्ये जागतिक संघटनेच्या विशेष बैठकीनंतर अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी सौदी अरेबियाला अधिकृत यजमान म्हणून घोषित केले. या घोषणेनंतर अनुभवी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले की, 'आतापर्यंतचा सर्वात खास विश्वचषक, स्वप्न पूर्ण झाले. पोर्तुगाल 2030 च्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. यापूर्वी 1930 मध्ये उरुग्वेने विश्वचषकाचे आयोजन केले होते. 2030 च्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचे आयोजन केले जाईल. उद्घाटन सोहळाही याच देशात होणार आहे. उरुग्वे व्यतिरिक्त, अर्जेंटिना आणि पॅराग्वे देखील 2030 च्या विश्वचषकातील प्रत्येकी एक सामना आयोजित करतील.
Introducing the hosts for the next two editions of the @FIFAWorldCup! 🏆
— FIFA (@FIFAcom) December 11, 2024
Morocco, Portugal and Spain will host in 2030, with centenary celebration matches in Argentina, Paraguay and Uruguay.
Four years later, Saudi Arabia will host the FIFA World Cup 2034™. pic.twitter.com/WdOEdNEVxH
पुढील विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार
पुढील फुटबॉल विश्वचषक 2026 मध्ये होणार आहे. याचे आयोजन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करत आहेत.
Congratulations to all my friends in Saudi, I know how proud you all are today and I am sure @Saudi2034 will be historic 🇸🇦🏆#WelcomeToSaudi34 pic.twitter.com/m0GB1O2R4w
— Cristiano Ronaldo (@Cristiano) December 11, 2024
अर्जेंटिनाने मागचा विश्वचषक जिंकला होता, मेस्सीने दोन गोल केले होते
फुटबॉल विश्वचषकाचा शेवटचा हंगाम 2022 मध्ये कतारमध्ये झाला होता. तो अर्जेंटिनाने जिंकला. या संघाने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. यामुळे सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. लिओनेल मेस्सीने सामन्यात 2 गोल केले, तर फ्रान्सच्या कायलियन एमबाप्पेने 3 गोल केले.
Um sonho tornado realidade 🇵🇹 Portugal vai receber o Mundial 2030 e encher-nos de orgulho. Juntos! pic.twitter.com/rkxkf8bYUZ
— Cristiano Ronaldo (@Cristiano) December 11, 2024
इतर महत्वाच्या बातम्या