एक्स्प्लोर
IPL 2025 बाबत मोठी अपडेट; पहिल्या सामन्यात KKR vs RCB भिडणार, 'या' दिवशी होणार अंतिम सामना
आयपीएलचा अठरावा हंगाम 22 मार्च शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

IPL 2025 To Begin On March 22 With KKR vs RCB
1/10

आयपीएलचा अठरावा हंगाम 22 मार्च शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
2/10

परंपरेनुसार, हंगामातील पहिला सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवला जाईल.
3/10

मागील विजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) होता, त्यामुळे परंपरेनुसार, यावेळी सलामीचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
4/10

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, पहिल्या सामन्यात केकेआरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल.
5/10

आरसीबीने अलीकडेच रजत पाटीदारला त्यांचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केले.
6/10

त्याच वेळी, गेल्या हंगामातील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद (SRH) देखील त्यांच्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळेल.
7/10

रविवार, 23 मार्च रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात एसआरएचचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल.
8/10

आयपीएल 2024 चे संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.
9/10

परंतु काही महत्त्वाच्या सामन्यांच्या तारखा फ्रँचायझींसोबत अनधिकृतपणे शेअर करण्यात आल्या आहेत.
10/10

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अंतिम सामना रविवार 25 मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल, जे गतविजेत्या संघाचे होमग्राउंड देखील आहे.
Published at : 14 Feb 2025 09:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion