एक्स्प्लोर
Champions Trophy Prize Money : चॅम्पियन्स ट्रॉफीत A टू Z संघावर होणार पैशांची बरसात; तळ्यात असणाऱ्या टीमवरही कोट्यवधी रुपयांची उधळण
ICC Champions Trophy Prize Money : दरम्यान, आयसीसीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे, ज्यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.

ICC Champions Trophy 2025 prize money
1/11

19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सुरुवातीची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
2/11

ही महत्त्वाची आयसीसी स्पर्धा शेवटची 2017 मध्ये खेळवण्यात आली होती, त्यानंतर आता ती आयोजित केली जात आहे.
3/11

दरम्यान, आयसीसीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे, ज्यामध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.
4/11

आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी माहिती दिली आहे की 2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तुलनेत यावेळी बक्षीस रकमेत 53 टक्के वाढ करण्यात आली आहे.
5/11

जर आपण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी आयसीसीने जाहीर केलेल्या बक्षीस रकमेवर नजर टाकली तर, स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला सुमारे 19.50 कोटी रुपये मिळतील.
6/11

आयसीसीने संपूर्ण स्पर्धेसाठी 6.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे 60 कोटी रुपये) बक्षीस रक्कम ठेवली आहे.
7/11

अंतिम सामन्यात उपविजेत्या संघाला सुमारे 10 कोटी रुपये मिळतील.
8/11

याशिवाय, उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्या संघांना अंदाजे 5-5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देखील दिली जाईल.
9/11

याशिवाय, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असलेल्या संघाला सुमारे 3 कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळेल.
10/11

तर सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघाला सुमारे 1.21 कोटी रुपये मिळतील.
11/11

म्हणजे शेवटचा क्रमांक असणारा संघ पण रिकाम्या हाताने परतणार नाही.
Published at : 14 Feb 2025 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
