Zero Hour Suresh Dhas Meet Dhananjay Munde :धस, मुंडे आणि 'त्या' दोन भेटी;विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
नमस्कार मी विजय साळवी... तुम्ही पाहताय एबीपी माझा... झीरो अवरच्या विकेंड स्पेशलमध्ये आपलं स्वागत... मंडळी... आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी होती...
ती भाजप आमदार सुरेश धस आणि आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यातल्या भेटीची. साऱ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारी ही बातमी एबीपी माझानं ब्रेक केली.
मंडळी, याच सुरेश धस यांनी बीडच्या गुन्हेगारीचा आका असा उल्लेख करत धनंजय मुंडेंवर गेले दोन महिने दिवसरात्र आरोप केलेत...
याच सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर भर कार्यक्रमात नाव न घेता... धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली होती...
याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचा पालकमंत्री म्हणून विरोध केला....
याच सुरेश धस यांनी महादेव अॅपच्या माध्यमातून ९०० कोटींचा घोटाळ्याचा दावा केला...
याच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री असताना कोट्यवधींचे घोटाळे झाल्याचा आरोप केला..
धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा कधी घेणार... असं म्हणत गेल्या दोन महिन्यांमध्ये महायुतीच्या प्रमुखांचंही टेन्शन वाढवणारे... सुरेश धस... गेल्या काही दिवसांपासून मात्र... पूर्णपणे वेगळ्याच ट्रॅकवर शिफ्ट झाले... खरं तर तेव्हाच हा संशय आला होता.. की थेट धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा कधी घेणार? असा सवाल करणारे... सुरेश धस.. म्हणू लागले की त्यांनी कधीही राजीनाम्याची मागणी केली नाही...
खरं तर, सुरेश धस यांनी बीडच्या गुन्हेगारीचा आका म्हणत धनंजय मुंडेंकडे कायम बोट दाखवलंय.. कायम आका म्हणत आज सकाळीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता..
पण, मंडळी...
तेच सुरेश धस.... मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी गेले होते... एरवी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशिवाय गेल्या महिन्याभरात... बीडच्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर... हेच सुरेश धस दिवसाला किमान दोन वेळा तरी पत्रकारांना सामोरे गेले.. त्यांनीच धनंजय मुंडेंची भेट घेतली.. इतकंच नाही तर सुरेश धस हे धनंजय मुंडेंच्या घरीही पोहोचले होते.. त्यांच्यामधल्या भेटीची ही बातमी सर्वात आधी तुमचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या एबीपी माझानं दाखवली...
आता त्यात आणखी एक कमाल म्हणजे... ही भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मध्यस्थीनं झाल्याचा दावा सर्वात आधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.. आणि तोच दावा बावनकुळेंनी मान्य केला.. त्यानंतर बावनकुळेंनी आणखी काय काय वक्तव्य केलं.. आणि धनंजय मुंडेसोबतच्या भेटीसंदर्भात दस्तुरखुद्द सुरेश धस यांनीही काय वक्तव्य केलंय..
All Shows

































