मोठी बातमी! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त
New India Cooperative Bank : न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर (New India Cooperative Bank) रिझर्व बँकेनं (RBI) मोठी कारवाई केली आहे. या बँकेचं मुंबईचं संचालक मंडळ बरखास्त केले आहे.
New India Cooperative Bank : न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर (New India Cooperative Bank) रिझर्व बँकेनं (RBI) मोठी कारवाई केली आहे. या बँकेचं मुंबईचं संचालक मंडळ बरखास्त (dismisses board of directors) करण्यात आलं आहे. 12 महिन्यांसाठी हे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. आरबीआयकडून (RBI) संचालक मंडळाला हा मोठा दणका मानला जात आहे. आरबीआयकडून या बॅंकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासकाच्या मदतीला ॲडव्हायजर कमिटीची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. कमिटीमध्ये आरबीआयचे माजी जनरल मॅनेजर रविंद्र सप्रा आणि सीए अभिजित देशमुख यांची नियुक्ती
35 अ अंतर्गत आरबीआयकडून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली असून ही कारवाई 35 अ अंतर्गत करण्यात आली आहे. दरम्यान, बँकेच्या अंधेरी शाखेबाहेर उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने आत घेतले आहे. ज्यांचे लॉकर संदर्भात काम आहे त्यांनाच आत घेतले आहे. इतरांना उद्या येण्यास सांगितले आहे. बँकेची वेळ संपल्याने शाखा बंद करण्यात येत आहे.
बँकेतील आर्थिक अनियमितता लक्षाते घेऊन कारवाई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत. आता ही बँक कुणालाही नवीन कर्ज देऊ शकणार नाही आणि सध्याच्या कर्जाचे नूतनीकरणही करू शकणार नाही. तसेच, बँक नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही आणि कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, बँकेतील अलीकडील आर्थिक अनियमितता लक्षात घेऊन आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. हे निर्बंध 13 फेब्रुवारी 225 म्हणजे आजपापासून लागू होतील. पुढील सहा महिने लागू राहतील. या कालावधीत या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असेही आरबीआयने म्हटले आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, ठेवीदारांना त्यांच्या बचत किंवा चालू खात्यातून पैसे काढू देऊ नयेत, असे निर्देश बँकेला देण्यात आले आहेत. बँकेला ठेवींवर कर्ज सेट ऑफ करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळण्याचा अधिकार असेल.
महत्वाच्या बातम्या:
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
