ICC Mens ODI Team : आयसीसी एकदिवसीय टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार बाबर आझम, सिराज-अय्यरलाही मिळालं स्थान
ICC ODI Team Of the Year : आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताच्या श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजला स्थान मिळालं आहे.
ICC ODI Team of the Year : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 चा पुरुषांचा सर्वोत्कृष्ट ODI संघ जाहीर केला आहे. बाबर आझमला ICC ने घोषित केलेल्या 2022 च्या ODI संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी बाबर आझमने वनडेमध्ये कर्णधारपदाव्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाजी देखील केली होती. भारताच्या श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांनाही ICC पुरूष संघात स्थान मिळालं आहे. 2022 च्या सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही देशाच्या दोनपेक्षा जास्त खेळाडूंचा समावेश यात नाही. वर्षभरातील एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी किंवा अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणार्या खेळाडूंचा ICC वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष एकदिवसीय संघात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि भारतातील 2-2 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर पाकिस्तान, बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
सर्वोत्तम पुरुष एकदिवसीय संघावर एक नजर
बाबर आझम (कर्णधार, पाकिस्तान), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), शाई होप (वेस्ट इंडिज), श्रेयस अय्यर (भारत), टॉम लॅथम (विकेटकीपर, न्यूझीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), मेहंदी हसन (बांगलादेश), अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज), मोहम्मद सिराज (भारत), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया).
View this post on Instagram
बाबर आझमची अप्रतिम कामगिरी
बाबर आझमला (Babar Azam) आयसीसी टीम ऑफ द इयर 2022 (ICC ODI Team of the Year) चं कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्याने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली असून फलंदाजीही उत्कृष्ट केली आहे. 2022 मध्ये बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 9 सामने खेळले त्यापैकी 8 जिंकले आणि एक पराभव झाला. गेल्या वर्षी पाकिस्तानची वनडे जिंकण्याची टक्केवारी 88.88 होती. यादरम्यान बाबर आझमच्या बॅटमधून अनेक धावा निघाल्या. 2022 मध्ये बाबरने 9 सामन्यांच्या सर्व डावात 679 धावा केल्या. यादरम्यान त्यानं तीन शतकं आणि पाच अर्धशतकं झळकावली. बाबर आझमचा गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 114 धावा होती.
हे देखील वाचा-