एक्स्प्लोर
Champions Trophy 2025 Ind vs Pak: शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारला कोहलीने काय केलं?; षटक पूर्ण होताच जवळ गेला अन्...
Champions Trophy 2025 Ind vs Pak: पाकिस्तानकडून फिरकीपटू अबरार अहमदने चांगली गोलंदाजी केली.
Champions_Trophy_2025_Ind_vs_Pak
1/10

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला.
2/10

पाकिस्तानविरुद्धच्या या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं.
3/10

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 241 धावा केल्या. या प्रत्युत्तरात भारताने 42.3 षटकांत धावांचा पाठलाग करत सहज विजय मिळवला.
4/10

भारताकडून विराट कोहलीचे सर्वाधिक 100 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 56 आणि शुभमन गिलने 46 धावा केल्या.
5/10

रोहित शर्मा बाद होताच विराट कोहली मैदानात आला. त्यानंतर शुभमन गिलने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली.
6/10

शुभमन गिलची विकेट घेताच अबरारने त्याला मान हलवत जा..जा..जा..असा इशारा करत डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभमन गिलने त्याकडे लक्ष दिले नाही.
7/10

पाकिस्तानकडून फिरकीपटू अबरार अहमदने चांगली गोलंदाजी केली. अबरारने शुभमन गिलला त्रिफळाचीत करत भारताला दुसरा धक्का दिला.
8/10

अबराराने 10 षटक पूर्ण केले. यामध्ये त्याने 28 धावा देत 1 विकेट्स घेतली.
9/10

अबरारच्या या गोलंदाजीचे विराट कोहलीने देखील कौतुक केले. अबरारचे 10 षटक पूर्ण होताच विराट कोहली त्याच्याजवळ गेला आणि त्याचे कौतुक केले.
10/10

विराट कोहली 2009 मध्ये पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला होता. पण या स्पर्धेत विराटने पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करण्यासाठी त्याला 16 वर्षे वाट पहावी लागली. त्याचवेळी, 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर त्याने प्रथमच एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले आहे.
Published at : 24 Feb 2025 09:02 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























