ICC Mens T20I Team : आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर, कर्णधार म्हणून बटलरचं नाव, सर्वाधिक भारतीय खेळाडूंना स्थान
ICC Team : 2022 वर्षभरात अनेक महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा झाल्या. विशेष म्हणजे टी20 विश्वचषक ही स्पर्धाही पार पडल्याने टी20 क्रिकेटमध्ये बरेच रेकॉर्डही झाले.
ICC Mens T20I Team of the Year 2022 : 2022 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी फार खास होतं. खासकरुन टी20 क्रिकेट तर वर्षभरात खूप खेळवण्यात आले. कारण टी20 चा विश्वचषक (T20 World Cup 2022) झालाच शिवाय आशिया कपही (Asia cup) यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच क्रिकेटर्सनी कमाल कामगिरी केली. ज्यानंतर आता आयसीसी पुरस्कारही जाहीर होत असून आयसीसीने नुकतीच आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर जाहीर (ICC Mens T20I Team of the Year 2022) जाहीर केली, ज्याचं कर्णधारपद विश्वचषक विजेत्या जोस बटलर (Jos Buttler) याला सोपवण्यात आलं आहे. तर भारतीय संघातील दोन स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पांड्याा (Hardik Pandya) यालाही स्थान देण्यात आलं आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय खेळाडू सर्वाधिक आहेत. याशिवाय इंग्लंडचा सॅम करन (sam curran), झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (sikandar raza), पाकिस्तानचे मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan), हॅरीस रौफ (Haris Rauf) या खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे. तर संपूर्ण संघ कसा आहे पाहूया...
आयसीसी टी20 टीम ऑफ द ईयर-
- जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर)
- मोहम्मद रिझवान
- विराट कोहली
- सूर्यकुमार यादव
- ग्लेन फिलिप्स
- सिकंदर रझा
- हार्दिक पांड्या
- सॅम करन
- वानिंदू हसरंगा
- हॅरीस रौफ
- जोश लिटिल
View this post on Instagram
तर या संघाचा विचार करता भारताचे तीन, पाकिस्तानचे दोन, इंग्लंडचे दोन, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचं नाव ICC च्या सर्वोत्तम T20 संघात आहे. विशेष म्हणजे, यंदा आयसीसीनं 2022 च्या सर्वोत्कृष्ट T20 आंतरराष्ट्रीय संघात स्टार संघाशिवाय आयर्लंड आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड केली आहे. याचं कारण या दोघांनी 2022 वर्षात टी20 फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. याच कारणामुळे दोन्ही खेळाडूंना आयपीएल लिलावातही विकत घेण्यात आले होते. हे दोन खेळाडू म्हणजे सिकंदर रझा आणि जोश लिटल असून रझा हा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे, तर लिटल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे.
हे देखील वाचा-