(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Aus Test Series : 4 सामने, 4 शतके; ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माच्या जागी 'हा' धडाकेबाज फलंदाजाच मैदान गाजवणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका जवळ येत आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे.
India Vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका जवळ येत आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. दरम्यान, रोहित शर्मा मालिकेतील एका सामन्याला मुकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, ही पहिली कसोटी असणार की दुसरी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आता प्रश्न असाही निर्माण झाला आहे की, जर रोहित शर्मा एकाद्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला तर सलामीवर कोण असणार? याचे उत्तर बऱ्याच अंशी उपलब्ध असल्याचे दिसते, पण निवडकर्ते त्या पर्यायाचा विचार करतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका नोव्हेंबरपासून होणार सुरू
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळणार असून त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दरम्यान, रोहित शर्माबाबत बातम्या येत आहेत. यशस्वी जैस्वालने आपले सलामीचे स्थान निश्चित केले आहे. संपूर्ण मालिकेसाठी त्याची निवड होणार असून तो सलामीवीर म्हणून दिसणार आहे. दरम्यान, प्रश्न दुसऱ्या सलामीवीराचा असेल. एका सामन्यासाठी शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणणार का? असे झाल्यास अनेक स्लॉट बदलावे लागतील. पण अभिमन्यू ईश्वरन हा पर्याय असू शकतात.
अभिमन्यू इसवरनने ठोकले सलग चौथे शतक
अभिमन्यू ईश्वरन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. बंगालकडून खेळताना अभिमन्यू इसवरनने लखनौमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने 172 चेंडूत नाबाद 127 धावा केल्या. पहिल्या डावात 51 धावा करणाऱ्या अभिमन्यूने दुसऱ्या डावात ती उणीव दूर केली. सलग 4 सामन्यातील त्याचे हे चौथे शतक आहे. अभिमन्यूने नुकतेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या संयमाने तो भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.
अभिमन्यूचे प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड
अभिमन्यूने अद्याप भारतासाठी कसोटी पदार्पण केलेले नाही, परंतु त्याची प्रथम श्रेणीतील आकडेवारी उत्कृष्ट आहे. अभिमन्यूने आतापर्यंत 98 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 7506 धावा आहेत. त्याची सरासरी 49.38 आहे आणि तो सुमारे 53 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. आतापर्यंत त्याने 26 शतके आणि 29 अर्धशतके झळकावली आहेत. एवढ्या चमकदार कामगिरीनंतरही अभिमन्यूला भारतीय संघात संधी न मिळाल्यास ते दुर्दैवी आहे. पुढच्या मालिकेत अभिमन्यूला संधी मिळते की नाही हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -