एक्स्प्लोर

Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे.

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा (Ladki Bahin Yojana) एक हप्ता देऊ नका. पण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके (Jayshree Shelke) यांनी केले आहे. 

जयश्री शेळके म्हणाल्या की,  शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी करणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे दोषी असून त्यांना शिक्षाही झाली आहे. मात्र, त्यांच्या शिक्षेवर स्थगिती न दिल्यास ते आमदारकीतून अपात्र ठरतील आणि त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि हा जनतेचा पैसा खर्च म्हणून परवडणारा नाही, असे निरीक्षण कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षा स्थगितीच्या सुनावणीत नाशिक न्यायालयाने नोंदवले आहे.

तर न्याय कोणाला मागावा?

हे अतिशय दुर्दैवी असून न्यायालयच जर अशा प्रकारे निरीक्षण नोंदवत असतील तर न्याय कोणाला मागावा? राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींचा एक हप्ता देऊ नये. मात्र, माणिकराव कोकाटे हे पात्र की अपात्र? हे त्यांच्या मतदारसंघातील जनतेला ठरवूच द्या, अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी घेतली आहे.  

नेमकं प्रकरण काय? 

1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर करण्यात आला होता. याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं.यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेलं होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. या प्रकरणी कोर्टानं 20 फेब्रुवारी रोजी  निकाल दिला देऊन कोकाटेंना  2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. कनिष्ठ न्यायालयानं कोकाटेंना दिलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिलीय. माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा देताना महत्वाची टिपण्णी केली आहे. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा 

शिक्षेला स्थगिती ते फेरनिवडणूक! कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या केसमध्ये कोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 15 March 2025Anjali Damania on Santosh Deshmukh | अंजली दमानियांचा संतोष देशमुख प्रकरणावरून फोटोवरून नवा आरोपFarmer Suicide Maharashtra | राज्यात वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Embed widget