एक्स्प्लोर

Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा

Satara News : पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह युवकाचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यात घडली आहे.

Satara News : पोहायला शिकवत असताना वाचवायला गेलेल्या व्यक्तीसह युवकाचा विहीरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड (Karad) तालुक्यातील करवडी येथे घडली. एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे करवडी (Karwadi) गावावर शोककळा पसरली आहे. राजवर्धन किशोर पाटील (22) आणि राजेंद्र दादा कोळेकर (55) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, करवडी गावाच्या हद्दीत भटकी नावाच्या शिवारात सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक किशोर पाटील आणि त्यांच्या बंधूंची शेत जमीन आणि विहीर आहे. या विहिरीवर सुरू असलेली मोटर बंद करण्यासाठी किशोर पाटील यांचा मुलगा राजवर्धन आणि त्यांच्या शेतात काम करणारे कर्मचारी राजेंद्र कोळेकर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गेले होते. 

विहिरीत पोहायला गेलेले दोन जण बुडाले

मोटर बंद केल्यानंतर राजेंद्र कोळेकर याला पोहण्याची इच्छा झाली. त्यावेळी परवानगी घेण्यासाठी राजवर्धन यांनी फोनवरून वडिलांना तशी कल्पना दिली. मात्र दुपारची वेळ आहे विहिरीत उतरू नका, असे वडिलांनी सांगितले होते. फोन बंद झाल्यानंतर राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते.  पंधरा-वीस मिनिट झाल्यानंतर किशोर पाटील यांनी मुलगा राजवर्धन आणि राजेंद्र यांना घरी येण्यासाठी फोन केला. मात्र अनेकदा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्यामुळे शेवटी किशोर पाटील दुचाकीवरून शेताकडे आले. 

दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

विहिरीच्या बाहेर शेजारी दोघा जणांचे कपडे, चपला त्यांना आढळून आल्या. शंका आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना आणि घरातील लोकांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीतील सर्व सहा मोटर सुरू करून पाणी उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र वीज पुरवठा बंद झाल्याने आणि विहीर खोल असल्यामुळे संपूर्ण पाणी उपसता आले नाही. शेवटी कराडमधील मासेमारी करणाऱ्या युवकांना बोलवण्यात आले. त्यांनी पाण्यामध्ये उतरून राजवर्धन आणि राजेंद्र कोळेकर यांचे यांचे पार्थिव बाहेर काढले. रात्री उशिरा करवडी गावात या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik : आमदार साहेब, तुमची बहीण मारली! नाशकात प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन; चिठ्ठीत 16 नावं लिहिली; नेमकं काय घडलं?

Chandrapur Bus Accident : नादुरुस्त ट्रकला बसची जोरदार धडक; भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू, 11 ते 12 प्रवासी जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer Suicide Maharashtra | राज्यात वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 15 March 2025TOP 70 | टॉप 70 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Embed widget