एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2022: विश्वचषकात विराट कोहलीचं भारतीय संघातील स्थान धोक्यात? 15 सप्टेंबरला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मते, विश्वचषकासाठी भारताचा 80 ते 90 टक्के संघ तयार आहे.

T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मते, विश्वचषकासाठी भारताचा 80 ते 90 टक्के संघ तयार आहे. पण रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, आतापर्यंत निवडकर्त्यांनी अंतिम संघाची यादी जाहीर केली नाहीये. आशिया चषक स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीच्या नजरा असतील. निवडकर्ते 15 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी संघ निवडतील. सध्या भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. तसेच आशिया चषकात विराट चांगली कामगिरी करून दाखवेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 

इनसाइड स्पोर्टच्या वृत्तानुसार, एका निवडकर्त्यानं सांगितलं की, “रोहित शर्मा संघ व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. पण निवडकर्ते वेगळा विचार करत आहेत. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी निवड समितीची बैठक होणार आहे. अनेक ठिकाणी खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. विराट कोहलीची जागाही निश्चित नाही", असंही त्यानं म्हटलंय. निवडकर्त्यानं पुढं म्हटलंय की, आणखी बऱ्याच खेळाडूंच्या कामगिरीवर आम्ही लक्ष ठेवून आहेत. तसेच हर्षल पटेल, जसप्रीत बुमराहच्या फिटनेसच्या अहवालांरकडं आमचं लक्ष असेल. दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त असून नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. आम्ही त्यांची दुखापतीतून सावरण्याची वाट पाहत आहोत. विराट कोहली आशिया चषकात कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं आहे."

चार गोलंदाजांचं स्थान जवळपास निश्चित
निवडकर्ते 15 सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहेत. या दिवशी निवडकर्त्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा देखील सहभागी होणार आहेत. आशिया चषक 11 सप्टेंबर रोजी संपत असून त्यानंतर हे खेळाडू भारतात परततील. आशिया चषकासाठी भारतीय संघात फक्त तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या पाहता संघात चार वेगवान गोलंदाज मिळणं निश्‍चित आहे. युझवेंद्र चहलशिवाय संघातील दुसरा फिरकीपटू कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज
विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget