एक्स्प्लोर
In Pics : आशिया कप 2022 वर श्रीलंकेनं कोरलं नाव, विजयानंतर खेळाडूंचा धिंगाणा
PAK vs SL : आशिया कप 2022 स्पर्धेत श्रीलंका संघाने पाकिस्तानला 23 धावांनी मात देत विजय मिळवला आहे. विजयानंतर श्रीलंकन खेळाडू कमालीचे आनंदी दिसत होते.
Sri lanka won Asia Cup 2022
1/11

आशिया चषक 2022 स्पर्धेत खराब सुरुवात होऊनही अखेरच्या सामन्यांमध्ये कमाल कामगिरी करत श्रीलंका संघाने विजय मिळवला आहे.
2/11

फायनलमध्ये श्रीलंका संघाने पाकिस्तानला 23 धावांनी मात देत आशिया चषक 2022 जिंकला आहे.
3/11

कर्णधार दासून शनाका याच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाने यंदा आशिया चषकाला गवसणी घातली आहे.
4/11

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. ज्यानंतर दमदार गोलंदाजी करत श्रीलंकेनं पाकिस्तानला 147 धावांवर सर्वबाद करत 23 धावांनी सामना जिंकला.
5/11

श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू वानिंदू हसरंगा याने सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली.
6/11

विजयानंतर श्रीलंकने खेळाडू अगदी मैदानातच एकमेंकाना मिठी मारु लागल्याचं दिसून आलं.
7/11

या विजयानंतर ट्रॉफीसोबत श्रीलंका संघाने दमदार असं सेलिब्रेशन केलं.
8/11

श्रीलंकेनं यंदा ट्रॉफी जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला आहे. यामुळे सर्वाधिक वेळा चषक मिळवणाऱ्यांच्या यादीत भारतानंतर श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.
9/11

श्रीलंका संघाची स्पर्धेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. त्यांना पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतरही श्रीलंकेनं विजय मिळवत सर्वांना चकीत केलं आहे.
10/11

या विजयानंतर आता श्रीलंका आयसीसी टी20 विश्वचषकासाठी सज्ज झाली असून त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
11/11

16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये श्रीलंका एक तगडं आव्हान नक्कीच देईल.
Published at : 12 Sep 2022 12:32 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग


















