Asia Cup 2022 : चेन्नई सुपरकिंग्स आणि जाडेजामध्ये वादाची चर्चा, पण CSK ने शेअर केलेली खास पोस्ट पाहाच
Chennai Super Kings: रवींद्र जाडेजा आशिया कप स्पर्धेतून दुखापतीमुळे नुकताच स्पर्धेबाहेर झाला आहे. ज्यानंतर आता चेन्नई सुपरकिंग्सने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती.
Ravindra Jadeja and CSK : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि त्यांचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांच्यात वादाच्या बातम्या समोर येत होत्या. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले होते की जाडेजा सीएसकेसंघापासून वेगळा होण्याची चर्चा सुरु होती. पण या चर्चेमध्येच आता CSK ने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन जाडेजासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
सीएसकेने रवींद्र जाडेजासाठी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'जड्डू लवकर बरा व्हा आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परत ये.' यासोबतच सीएसकेने जाडेजाचा एक फोटोही शेअर केला आहे. सीएसकेची ही पोस्ट यासाठी खास आहे कारण, आयपीएल 2022 नंतर जाडेजाने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व फोटो त्याच्या इंस्टाग्रामवरून काढून टाकले होते. तसच आयपीएलनंतर त्याचा फ्रँचायझीशी कोणताही संवाद नसल्याचेही काही रिपोर्ट्समधून समोर आले होते. पण आता सीएसकेने शेअर केलेल्या या पोस्टमुळे चेन्नई आणि जाडेजाचे चाहते सुखावले आहेत.
Speedy Recovery, Jaddu! Come back stronger than ever!#AsiaCup2022 #WhistlePodu 🦁💛 @imjadeja pic.twitter.com/zjuKx19eNQ
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 2, 2022
जाडेजा आशिया कपमधून बाहेर, बीसीसीआयची माहिती
बीसीसीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलंय की, "सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची संघात निवड केलीय. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान, अक्षर पटेलची संघात स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. रवींद्र जाडेजाच्या दुखापतीमुळं त्याला भारतीय संघात संधी देण्यात आलीय. लवकरच तो भारतीय संघात सामील होईल.
भारताला मोठा धक्का
आशिया चषकादरम्यान रवींद्र जाडेजाचं दुखापतग्रस्त होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र जाडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यात त्यानं भारतासाठी 35 धावांचं महत्वाचं योगदान दिलं होतं. तर, हाँगकाँगविरुद्ध त्यानं चार षटकात 15 धावा देऊन 1 विकेट्स घेतली होती.
हे देखील वाचा-