Serena Williams: यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत सेरेना विल्यम्स पराभूत, लवकरच निवृत्ती घोषणा करण्याची शक्यता
Serena Williams Retirement: अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स यूएस ओपन 2022 च्या तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलीय.
Serena Williams Retirement: अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स यूएस ओपन 2022 च्या तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडलीय. ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉमलिजनोविकनं (Ajla Tomljanovic) तिचा 7-5, 6-7 (4), 6-1 असा पराभव केलाय. या पराभवासह सेरेनाची चमकदार टेनिस कारकीर्दही संपल्याचं मानलं जात आहे. यूएस ओपनचा हा सामना तिच्या कारकिर्दीतील निरोपाचा सामना ठरण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या काही दिवसांपूर्वी सेरेनानं टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. यूएस ओपन 2022 ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, असंही तिनं म्हटलं होतं.
टेनिसमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर जगावर छाप सोडणारी सेरेना विल्यम्स जवळपास दीड वर्ष खराब फॉर्मशी झुंज देत होती. यूएस स्पर्धेपूर्वी तिला गेल्या 450 दिवसांत फक्त एकच सामना जिंकता आला होता. तसेच तिच्या क्रमवारीतही सातत्यानं घसरण पाहायला मिळाली. याचदरम्यान, सेरेना विल्यम्सनं टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला . यूएस ओपन स्पर्धा ही तिच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल, असंही तिनं म्हटलं होतं. यूएस ओपन स्पर्धेतील सलग दोन सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीत तिचा पराभव झाला. या पराभवासह तिचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. ज्यामुळं सेरेना ही लवकरच निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पराभवानंतर सेरेना भावूक
यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीतील पराभवानंतर सेरेनानं चाहत्यांना ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, त्यानुसार तिची निवृत्ती निश्चित मानली जात आहे. सेरेना म्हणाली की, "तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही सर्व आश्चर्यकारक आहात. धन्यवाद बाबा, मला माहित आहे की, मला तुम्ही बघतच असाल. धन्यवाद आई. अनेक दशकांपासून माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या तुम्हा सर्वांचे मी येथे आभार मानू इच्छिते. हे सर्व माझ्या पालकांपासून सुरू झाले. मी त्यांची आभारी आहे. मला माहित नाही, कदाचित हे आनंदाचे अश्रू आहेत."
ट्वीट-
सेरेनाच्या नावावर 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे
सेरेना विल्यम्सची गणना टेनिस जगतातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. तिनं आपल्या कारकिर्दीत 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. सेरेनानं 1995 मध्ये तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. गेली 27 वर्षे ती सतत टेनिस खेळत आहे.
हे देखील वाचा-