एक्स्प्लोर
न्या. लोयांच्या मृत्यूची CBI चौकशी नाही, सुप्रीम कोर्ट काय म्हणालं?
1/6

न्यायमूर्ती ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी होणार नाही, असा स्पष्ट निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
2/6

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर जे आरोप लावण्यात आले, ते अयोग्य असून, कोर्टाच्या अवमानास पात्र आहेत. पण आम्ही तशी कारवाई करत नाही. इतकंच नाही तर मीडिया रिपोर्टवरुन हा खटला ताणण्याचा प्रयत्न होत आहे, असंही कोर्टाने खडसावलं.
Published at : 19 Apr 2018 11:51 AM (IST)
View More























