एक्स्प्लोर
Maharashtra Kesari 2025: पंच दोषी आढळले तर पृथ्वीराज मोहोळकडून महाराष्ट्र केसरीची गदा काढून घेणार का? महत्त्वाची अपडेट
Maharashtra Kesari 2025: यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या कुस्ती स्पर्धेला वादाचं गालबोट लागलं.

Maharashtra Kesari 2025
1/8

पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2025) किताबाचा मानकरी ठरला.
2/8

अहिल्यानगरच्या बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीत 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली.
3/8

पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. या लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली.
4/8

यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचं गालबोट लागलं.
5/8

मॅट विभागाचा उपांत्य फेरीचा सामना नांदेडचा शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडली. पण या लढतीच्या निकालावरुन जोरदार राडा झाला.
6/8

पंचांनी शिवराज राक्षे चितपट झाल्याचा निर्णय दिला. पण हा निकाल मान्य नसल्याचं म्हणत राक्षेनं पंचांशी हुज्जत घातली. मात्र यादरम्यान त्याचा तोल सुटला आणि त्यानं थेट पंचांवर लाथ उगारली. त्यामुळे राज्यभरातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.
7/8

शिवराजने महाराष्ट्र कुस्तिगीर संघाकडे पंचांविरुद्ध तक्रार दाखल केल्यास आम्ही स्वतंत्र समितीद्वारे त्या प्रकरणाची चौकशी करू आणि यात पंच दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे.
8/8

पंच दोषी आढळल्यानंतरही अंतिम निकालावर परिणाम होणार नाही, असे महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले, त्यामुळे महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पृथ्वीराज मोहोळकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे.
Published at : 04 Feb 2025 02:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion