एक्स्प्लोर

Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव

नागपूरच्या झोन फाईव्हचे उपायुक्त निकेतन कदम हे आपल्या पथकासह एका दगडफेकीतील संशयीताला शोधण्यासाठी एका अरुंद गल्लीत गेले असता ही घटना घडली.

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. या घनटेनंतर नागपूरच्या पोलिसांनी (Police) तत्काळ आपली कुमूक मागवून व टीम तैनात करत जमावाला पांगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले. मात्र, या घटनेत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यात, पोलीस उपायुक्तांना चक्क कुऱ्हाडीचा वार सोसावा लागला. कुऱ्हाडीचा वार हातावर झेलमाऱ्या निकेतन कदम यांनी नागपूरच्या हिंसाचार घटनेचा थरारक अनुभव कथन केला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) झालेल्या हिंसाचाराच्या प्रचंड गदारोळात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस उपायुक्तांनी त्यांचा कालचा थरारक अनुभव एक्स्क्लुझिवली एबीपी माझासोबत शेअर  केला आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना चित्तथरारक अनुभव कथन केला. पोलिसांनी फक्त परिस्थिती हाताळलीच नाही तर अवघ्या काही तासात नागपूर शांत करून दाखवलं याचा प्रत्यय आपल्याला याची देही याची डोळा घटना अनुभवणाऱ्या पोलिसांच्या कथनातून येतोय. 

नागपूरच्या झोन फाईव्हचे उपायुक्त निकेतन कदम हे आपल्या पथकासह एका दगडफेकीतील संशयीताला शोधण्यासाठी एका अरुंद गल्लीत गेले असता, एका घरात संशयीताचा शोध घेत असताना कदम यांच्या 4 ते 5 सहकाऱ्यांना शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने घेरले होते. सर्वांच्या हातात लाठ्या, काठ्या आणि काही धारदार शस्त्र होते. आपल्या सहकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी डोक्यावर एक हेल्मेट आणि हातात एक काठी घेऊन निकेतन कदम जमावाच्या दिशेने गेले आणि हातातल्या काठीच्या माध्यमातून बहुतांशी जमावाला त्यांनी नियंत्रितही केले. मात्र, जमावातील एका माथेफिरूने त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला आणि त्यामध्ये निकेतन कदम यांचा हात गंभीररीत्या जखमी झाली. 

नागपूर पोलीसांची एक टीम आहे, आणि काल संकटाच्या वेळेला ती टीमच मैदानात उतरली होती. त्यामुळे हे कुठल्याही अधिकाऱ्याचं शौर्य नाही, तर नागपूर पोलीस दलाची कर्तव्य परायणता असल्याचे निकेतन कदम म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः व्हिडिओ कॉल करून नागपूर पोलिसांच्या कामगिरी संदर्भात समाधान व्यक्त करत पाठीवर शाबासकीची थाप दिल्याची माहितीही कदम यांनी दिली. कालची परिस्थिती खूप भयावह होती, चारही बाजूने दगडांचा वर्षाव होत होता, लोखंडी आणि धारदार हत्यारं वापरले जात होते आणि अशात संयम बाळगून संवेदनशीलतेने प्रसंग हाताळावे लागत होते. नागपूर पोलिसांनी ते करून दाखवले अशी भावनाही कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. 

उपायुक्त शशिकांत सातव यांचाही अनुभव

आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांच्या पायावर मोठा दगड लागल्यामुळे त्यांचाही पाय फ्रॅक्चर झाला आहे. सध्या तेही रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनीही थरारक अनुभव सांगितला. काल कोणत्या दिशेने दगड येईल, तो शरीराच्या कोणत्या भागाला जखमी करेल याची कुठलीही शाश्वती नव्हती. मात्र, पोलीस म्हणून कर्तव्य बजवायचे होते म्हणून आम्ही 20 पावलं पुढे जात होतो, पुन्हा दहा पावले मागे येत होतो. हळूहळू करून आम्ही समोर गेलो आणि दंगल उसळलेल्या भागाला शांत केलं. संशयीतांची धरपकड केली आणि त्यादरम्यानच जखमी झाल्याची भावना शशिकांत सातव यांनी एबीपी माझ्याशी बोलताना व्यक्त केली आहे.

हेही वाचा

नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती

व्हिडीओ

Sharad Pawar Health Update : शरद पवार होतोय श्वसनाचा त्रास, रुबी रुग्णालयात केलं दाखल
Ram Satpute On ZP Election : मोहिते पाटील आणि जानकरांना घरात बसवलं- राम सातपुते
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Bharat Gogawale ZP Celebration : जिल्हा परिषदेत लेकाचा विजय, भरत गोगावलेंचं विजयी सेलिब्रेशन
Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Tidme: आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
आधी म्हणाले, महानगरप्रमुख अन् नगरसेवकपदाचा राजीनामा देणार; आता शिंदे सेनेच्या प्रवीण तिदमेंनी निर्णय बदलला; माध्यमांसमोर सगळंच सांगितलं!
Ajit Pawar ZP Election Result: मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले
Satara ZP Election : शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणेंच्या पत्नी अर्चना रांजणेंचा पराभव
शिवेंद्रराजे भोसले यांना कुसुंबी गटात धक्का, अर्चना रांजणेंचा पराभव, जावळीतून धक्कादायक निकाल
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
जयकुमार गोरे यांना दोन धक्के, भारती गोरेंचा औंध तर अरुण गोरे यांचा कुकुडवाड गटातून पराभव, सोनल गोरे आंधळी गटातून विजयी
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
Embed widget