एक्स्प्लोर
Virat Kohli : विराट कोहली एक काम केल्यास कमबॅक करेल,आकाश चोप्रानं मार्ग सांगितला, म्हणाला...
T20 World Cup 2024: आयसीसी टी20 वर्ल्ड कप मध्ये भारत सुपर 8 मध्ये तीन सामने खेळणार आहे.यामध्ये विराट कोहलीची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.

विराट कोहली
1/5

वनडे वर्ल्ड कप 2023 आणि 2024 चं आयपीएल गाजवणाऱ्या विराट कोहलीला टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर गवसलेला नाही. विराट कोहली फॉर्ममध्ये कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2/5

विराट कोहलीनं आतापर्यं तीन मॅचमध्ये पाच धावा केल्या आहेत. विराट कोहली सुपर 8 च्या लढतींमध्ये फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त कला आहे.
3/5

आकाश चोप्रानं जिओ सिनेमावर आकाशवाणी कार्यक्रमात विराट कोहलीच्या कामगिरीवर भाष्य केलं. आकाश चोप्रा म्हणाला की विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्ध कमबॅक करेल.
4/5

विराट कोहली पहिल्या तीन मॅचमध्ये आक्रमकपणे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता. अफगाणिस्तान विरुद्ध सुपर 8 मध्ये खेळताना बॉल चांगल्या प्रकारे बॅटवर येईल. वेस्ट इंडिजमधील बाऊंड्री देखील मोठ्या नाहीत, त्यामुळं विराट कमबॅक करु, शकतो, असं आकाश चोप्रा म्हणाला.
5/5

विराट कोहलनं स्वत: ला वेळ दिला पाहिजे. बांगलादेशचे गोलंदाज फजलहक फारुकी आणि नवीन उल हक चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. अफगाणिस्तानकडे चांगले फिरकीपटू आहेत. विराटनं स्वत :ला वेळ दिल्यास फॉर्मची चिंता राहणार नाही, असं आकाश चोप्रा म्हणाला.
Published at : 19 Jun 2024 01:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
