Nagpur Murder : मुलीची छेड का काढता? जाब विचारणाऱ्या वडिलांची टवाळखोरांकडून हत्या, नागपुरात खळबळ
Nagpur Murder : मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोर आरोपींना जाब विचारण्यासाठी गेलेल्या वडिलांची आरोपींनी केली हत्या केल्याची घटना नागपुरात घडली.

नागपूर : रस्त्याने जाता-येता काही टवाळखोर आरोपी मुलीची छेड काढतात अशी माहिती समजताच आरोपींना जाब विचारायला गेलेल्या वडिलांची आरोपींनी भर रस्त्यातच निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. नागपूर शहरातील इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली घडली आहे. नरेश वालदे (53) असं हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. ते पेंटिंगचं काम करत होते.
गेल्या अनेक दिवसांपासून एक गुंड मृतक नरेश वालदे यांच्या मुलीला त्रास देत होता. या कारणावरून नरेश वालदे आणि त्या गुंडात काही दिवसांपूर्वी वादही झाला होता. त्यावेळी त्या आरोपींनी नरेश वालदे यांना जीवानिशी ठार मारू अशी धमकी देखील दिली होती.
फोन करुन बोलवलं अन्...
बुधवारी, 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास नरेश वालदे आपल्या कामात व्यस्त होते. त्यावेळी त्यांना अज्ञात मोबाईल नंबरवरून कॉल आला आणि त्यांना भेटण्याकरिता जाटतरोडी भागात बोलावले. नरेश हे दुचाकीने तिथे पोहोचले. त्यावेळी आरोपी हे आधीच तिथे उपस्थित होते. आरोपींनी धारदार शस्त्रांनी वार करत नरेश वालदे यांची हत्या केली आणि पळ काढला.
नरेश वालदे त्यांच्या वृद्ध आई आणि तीन मुलींसह नागपुरातील इमामवाडा परिसरात राहतात. आरोपी नेहमीच मुलींना त्रास देतात या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. मंगळवारी, 25 मार्चच्या रात्री ही नरेश वालदे यांच्या घरावर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्याची तक्रार इमामवाडा पोलिस ठाणे येथे दाखल केली असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलिस विभागाकडून कुणीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.
पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशयातून एकाची हत्या
पत्नीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय मनात घर करून बसल्याने एका तरुणाने थेट आपल्या घनिष्ट मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील देव्हाडी गावात घडली. संशयातून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, पतीने मित्राला चाकूने सपासप भोसकून जागीच ठार केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अंकुश साठवणे (38) असं मृतकाचं नाव असून तो देव्हाडी ग्रामपंचायतीचा सदस्य होता. तर, मुन्ना बिरणवार (32) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र काही दिवसांपासून आरोपीला आपल्या पत्नीचे अंकुशसोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. यातूनच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
ही बातमी वाचा:























