इकडं धनश्री वर्माने 4.75 कोटींसाठी कोर्टाचे खेटे मारले, तिकडं दाक्षिणात्य अभिनेत्रीने 200 कोटींच्या पोटगीवर लाथ मारली
Samantha Ruth Prabhu : इकडं धनश्री वर्माने 4.75 कोटींसाठी कोर्टाचे खेटे मारले, तिकडं दाक्षिणात्य अभिनेत्रीने 200 कोटींच्या पोटगीवर लाथ मारली

Samantha Ruth Prabhu : सध्या सर्वत्र क्रिकेटपूट युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. शिवाय, धनश्रीने चहलकडून घेतलेल्या 4.75 कोटींच्या पोटगी घेतली आहे. त्याच्याही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल हे 20 मार्च रोजी अधिकृतरित्या वेगळे झाले आहेत. चहलने घटस्फोटाचा निर्णय होण्यापूर्वीच काही रक्कम धनश्रीला दिली होती. मात्र, एकीकडे धनश्रीने 4.75 कोटींसाठी कोर्टाचे खेटे मारले. मात्र, दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभ हिने 200 कोटींच्या पोटगीवर लाथ मारल्याची चर्चा आहे.
बॉलिवूडमधील अनेक दाम्पत्यांनी घटस्फोट घेतले. मात्र, काही नाते असेही राहिले की, घटस्फोटानंतर एक रुपयांची पोटगीही घेण्यास नकार देण्यात आला होता. सामान्यत: घटस्फोटानंतर पत्नीला आर्थिक मदतीसाठी पतीकडून पोटगी दिली जाते, परंतु किती पैसे ठरवले जातात हे सर्वस्वी परस्पर संमतीवर अवलंबून असते. मात्र, दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभ हिने 1 रुपयाही पोटगी घेतली नाही. तिने स्वत:च्या हिंमतीवर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चाहत्यांकडून तिचं कौतुक होतं आहे.
View this post on Instagram
टॉलिवूडमधून बॉलिवूडमध्ये हळूहळू स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या समंथा रुथ प्रभूने 2017 मध्ये दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले. परंतु 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण कधीच उघड झाले नाही, परंतु बहुतेक लोक यासाठी नागा चैतन्यला जबाबदार धरतात. वृत्तानुसार, घटस्फोटाच्या बदल्यात सामंथाला 200 कोटी रुपयांची पोटगी देऊ करण्यात आली होती.
मात्र, समांथा रुथ प्रभू हिने ही पोटगी घेण्यास नकार दिला. घटस्फोटाच्या वेळी अभिनेत्री समांथा आई बनण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात होते. काही मीडिया रिपोर्टनुसार, पोटगीची रक्कम 50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते, जे समांथाने स्वीकारण्यासही नकार दिला. घटस्फोट घेतल्यानंतर समांथाने करियरवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
समांथा रुथ प्रभू नुकतेच वरुण धवनसोबतच्या 'सिटाडेल'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, घटस्फोटानंतर, समांथाला myositis या आजाराने गाठलं होतं. तिने सांगितले की, करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोच्या शूटिंगदरम्यान मला हा आजार झाला असल्याची माहिती मिळाली.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
'एका रात्रीचे किती घेतेस,...', अभिनेत्री सुरेखा कुडची यांना विचारणा; खळबळजनक खुलासे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
