25 हजार कोटींचं जगातील सर्वात महागडं घर, मुकेश अंबानींचा अँटिलियाही फिका, अमिताभ बच्चनही फिदा, कुणाचं आहे लक्ष्मी विलास पॅलेस?
Most Expensive House in the World : अलिशान निवासस्थान पाहून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनही फिदा, कुणाचं आहे लक्ष्मी विलास पॅलेस?

Most Expensive House in the World : देशातील सर्वांत श्रीमंत मुकेश यांचं घर म्हणजेच अँटिलिया नेहमी चर्चेचा विषय असतं. त्यांच्या सुरक्षेपासून अँटिलियामध्ये (Antilia) किती लोक काम करतात? त्यांना किती पगार दिला जातो. याबाबतची चर्चा केली जाते. मात्र, जगातील सर्वांत महागडं घर हे मुकेश अंबानींचं (Mukesh Ambani) नाही. जगातील सर्वात महागडं घर (Most Expensive House in the World) गुजरातमध्ये आहे. त्या घराचं नाव आहे (Laxmi Vilas Palace) लक्ष्मी विलास पॅलेस? ज्याला पाहून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) देखील आवाक झाले होते. जाणून घेऊयात...
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे घर असलेल्या अँटिलियाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे यांचे घर पाहिले आहे का? राधिकाराजे यांच्या घराचं नाव लक्ष्मी विलास पॅलेस आहे. ते मुकेश अंबानींच्या अँटिलियापेक्षा महाग आहे.
महाराणी राधिकाराजे गायकवाड या बडोद्याचे महाराजा समरजीतसिंह गायकवाड यांच्या पत्नी आहेत. राधिकाराजे या वयाच्या 46 वर्षे उलटल्यानंतर अतिशय सुंदर दिसतात, असं बोललं जातं. एवढेचं नाही तर त्या जगातील सर्वात महागड्या खासगी घरात राहतात. हे घर 30 लाख चौरस फुटांमध्ये पसरलेलं आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटेलियाच्या तुलनेत हे घर 61 पटींनी मोठं आहे. एवढचं नाही तर या राजवाड्याची किंमत देखील अँटिलियापेक्षा जास्त आहे. हे घर पाहून अमिताभ बच्चनही फिदा झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील मुकेश अंबानींचं अँटिलिया हे घर 15 हजार कोटींचं आहे. तर लक्ष्मी विलास पॅलेस 25 हजार कोटींचं आहे. हे गुजरातमधील वडोदरा शहरात आहे. त्याला बडोदा पॅलेस म्हणून देखील ओळखलं जातं. मौल्यवान असण्यासोबतच हा राजवाडा त्याच्या सौंदर्यासाठीही ओळखला जातो. राजवाड्याचे आतील फोटो आणि भव्य वास्तुकला पाहिल्यानंतर तुमचीही खात्री पटेल.
महाराजा समरजितसिंह राव गायकवाड हे बडोद्याचे 16 वे महाराज आहेत, जे 2012 मध्ये राजघराण्यातील सिंहासनावर विराजमान झाले. त्यांना श्रीमंत महाराजकुमारी पद्मजा राजे गायकवाड आणि नारायणी राजे या दोन मुली देखील आहेत. गायकवाड कुटुंबीय लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहतात. राजघराण्याची वास्तू पाहण्यासारखी आहे. 700 एकरमध्ये पसरलेला हा राजवाडा ब्रिटीश राजघराण्याचे निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा 4 पट मोठा आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी 1890 मध्ये 27 लाख रुपये (180,000 पौंड) मध्ये हा राजवाडा बांधला. या घराचे संपूर्ण काम ब्रिटिश आर्किटेक्चर मेजर चार्ल्स मुंट यांच्या देखरेखीखाली झाले. हा राजवाडा भारतातील राजेशाही संस्कृतीचे प्रतीक आहे. पॅलेसमध्ये 170 खोल्या आणि सुंदर बागा आहेत. येथे एक स्थिर, स्विमिंग पूल आणि खाजगी गोल्फ कोर्स आहे. रॉयल म्युझियम, ज्यामध्ये अमूल्य कलाकृती आणि ऐतिहासिक वारसा दाखवण्यात आलाय.
मुकेश अंबानींचा अँटिलिया आणि ब्रिटीश राजघराण्यातील बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मोठा असलेला लक्ष्मी विलास पॅलेस पाहून अमिताभ बच्चनही फिदा झाले होते..त्यांनी दिवाणखान्यात कुटुंबासोबत फोटो तर काढलेच पण राजवाड्याच्या सौंदर्याचेही कौतुक केले.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
