आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याला महत्त्व देण्यात आलं आहे.
तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेले पाणी प्यायल्यास शरीरातील अशुद्ध घटक बाहेर पडतात.
तांब्याच्या भांड्यात अँटी मायक्रोबियल, अँटिऑक्सिडंट, असे अनेक गुणधर्म असतात जे शरीरासाठी फायद्याचे आहेत.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते.
तांब्यातील पाणी पिल्याने, पचनक्रिया सुधारते व शरीरातील खराब चरबी कमी होण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित राहतात.
आयुर्वेदातच नव्हे तर वैज्ञानिक तज्ज्ञांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिणं फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील युरीक अॅसिड कमी होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.