एक्स्प्लोर
Indian Sports Honours 2023 : पुरस्कार सोहळ्यात विराट-अनुष्काची जबरदस्त केमिस्ट्री
Indian Sports Honours 2023 : इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.

Virat Kohli Anushka Sharma
1/9

इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.
2/9

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची गणना सध्याच्या काळातील सर्वात सुंदर जोड्यामध्ये केली जाते.
3/9

इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत हजेरी लावली.
4/9

यो सोहळ्यासाठी अनुष्का शर्माने जांभळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेसला पसंती दिली होती. तर विराट कोहलीने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
5/9

विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्ससोबतच्या लाईव्ह शोमध्ये सांगितलं होतं की अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीदरम्यान तो फार नर्व्हस झाला होता.
6/9

या पुरस्कार सोहळ्यात विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत हातात हात घालून पोहोचला. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागला नाही, तर विराटही वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये दिसला.
7/9

विराट कोहलीसाठी हे वर्ष फलंदाजीसाठी खूप चांगलं ठरलं. त्याने वनडेसोबतच कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घ काळानंतर शतक झळकावलं. आता त्याची नजर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच आरसीबीला विजेता बनवण्यावर असेल.
8/9

तर अनुष्का शर्मा 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.
9/9

अनुष्का आणि विराट बऱ्याचदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात असतात. चाहते देखील आपल्या आवडत्या जोडीवर लाईक्स आणि कमेंट करुन आपलं प्रेम दर्शवतात.
Published at : 24 Mar 2023 07:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
