एक्स्प्लोर
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.

Gautam Gambhir vs Ajit Agarkar
1/10

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया शनिवारी (15 फेब्रुवारी) दुबईला रवाना झाली आहे.
2/10

रोहित शर्मा आणि कंपनी 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने या मेगा स्पर्धेत आपली मोहिम सुरू करतील.
3/10

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. अहवालानुसार, संघ निवडीदरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात जोरदार वाद झाला.
4/10

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडला जात असताना झालेल्या बैठकीत गौतम गंभीर आणि अजित आगरकर एकाच पानावर नव्हते, असे वृत्त समोर आले आहे. म्हणजे दोघांचेही विचार वेगवेगळे होते आणि म्हणूनच त्यांच्यात वाद झाला.
5/10

अलिकडेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने शानदार कामगिरी केली. रोहित शर्मा आणि कंपनीने ब्रिटीशांना 3-0 असे हरवले. या मालिकेत, श्रेयस अय्यरने तिन्ही सामन्यांमध्ये फलंदाजीने धावा केल्या. मात्र, पहिल्या सामन्यानंतर त्याने एक मोठा खुलासा केला.
6/10

श्रेयसने आजचा सामना खेळणार नसल्याचे सांगितले होते. अचानक विराट कोहलीच्या पायाला सूज आली आणि त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले.
7/10

मालिका संपल्यानंतर गंभीरला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, श्रेयस अय्यर प्रत्येक सामना खेळणार आहे.
8/10

आता मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, श्रेयस अय्यरच्या निवडीवरून अजित आगरकर आणि गौतम गंभीरमध्ये जोरदार वाद झाला होता.
9/10

मुख्य प्रशिक्षकांना मधल्या फळीत डाव्या आणि उजव्या हाताच्या संघटनावर लक्ष केंद्रित करायचे होते. अजित आगरकरची यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती ऋषभ पंत होता उघड झाले आहे, परंतु गौतम गंभीरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्पष्ट केले होते की, सध्या राहुल हा त्याचा नंबर-1 यष्टिरक्षक आहे आणि तो भविष्यातही खेळेल.
10/10

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती
Published at : 17 Feb 2025 10:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
