एक्स्प्लोर
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अगदी 6 महिन्याआधी श्रीलंकेच्या संघावर झाला दहशतवादी हल्ला; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलेलं?
Champions Trophy 2025: सुमारे 16 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून टाकले.

Champions Trophy 2025
1/10

आजपासून (19 फेब्रुवारी) चॅम्पियन्स ट्राफी 2025 च्या (Champions Trophy 2025) स्पर्धेला सुरवात होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand) आज पहिली लढत होणार आहे. पाकिस्तानमधील कराची मैदानात हा सामना खेळण्यात येईल.
2/10

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद घोषित केल्यापासून सुरक्षा व्यवस्थेवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
3/10

सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने भारताला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला. म्हणूनच भारतीय संघ हायब्रिड मॉडेलमुळे दुबईमध्ये आपले सामने खेळणार आहे. पण पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यांचा मोठा इतिहास आहे.
4/10

सुमारे 16 वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून टाकले.
5/10

2009 साली जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार होती. त्याच्या सहा महिन्यांपूर्वी, श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता.
6/10

श्रीलंकेला पाकिस्तानात तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे होते.
7/10

श्रीलंकेने एकदिवसीय मालिका 2-1 जिंकली आणि पहिली कसोटी अनिर्णित राहिली. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्च 2009 दरम्यान खेळवण्यात येणार होता. त्यावेळी सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक निवेदन जारी करून म्हटले होते की लिबर्टी स्क्वेअरजवळ 12 सशस्त्र दहशतवादी लपले आहेत.
8/10

श्रीलंकेचा संघ जेव्हा हॉटेलमधून गद्दाफी मैदानाकडे निघाला तेव्हा दहशतवाद्यांनी संघाच्या बसवर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला.
9/10

पाकिस्तान पोलिसांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले, परंतु या चकमकीत 6 पोलिस आणि 2 नागरिकांचा मृत्यू झाला. 20 मिनिटांनंतर दहशतवादी रॉकेट लाँचर आणि ग्रेनेड सोडून पळून गेल्याचे समोर आले.
10/10

सदर हल्ल्यात श्रीलंकेचे थिलन समरवीरा, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, थरंगा परानविताना, अजंता मेंडिस, चामिंडा वास आणि सुरंगा लकमल जखमी झाले. समरवीरा आणि परानविताना यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर, मैदानावर हेलिकॉप्टर बोलावून श्रीलंकेच्या संघाला घटनास्थळावरून नेण्यात आले आणि शक्य तितक्या लवकर विमानाची व्यवस्था करून त्यांना श्रीलंकेला परत पाठवण्यात आले.
Published at : 19 Feb 2025 08:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion