एक्स्प्लोर
Vighnesh Puthur 2025: रिक्षा चालकाचा मुलगा, 30 लाख रुपयांची बोली; विघ्नेश पुथूरने किती कोटींच्या फलंदाजांना बाद केले?
Vighnesh Puthur 2025: चेन्नई आणि मुंबईच्या या सामन्यात मुंबईकडून इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या विघ्नेश पुथूर याची चर्चा रंगली आहे.

Vighnesh Puthur
1/9

Vighnesh Puthur: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Mumbai Indians vs Chennai Super Kings) बाजी मारली.
2/9

चेन्नईने मुंबईवर 4 विकेट्सने मात करत विजय मिळवला.
3/9

चेन्नई आणि मुंबईच्या या सामन्यात मुंबईकडून इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या विघ्नेश पुथूर याची चर्चा रंगली आहे.
4/9

विघ्नेश पुथूरने चेन्नईविरुद्ध चांगली कामगिरी केली. विघ्नेश पुथूरने 4 षटकांत 32 धावा देत 3 विकेट्स पटकावल्या.
5/9

मुंबई इंडियन्स विघ्नेश पुथूरला 30 लाखांत खरेदी केला होता. मात्र या खेळाडूने चेन्नईने खरेदी केलेल्या कोटी-कोटी रुपयांच्या खेळाडूंना बाद केले.
6/9

विघ्नेश पुथूरने ऋतुराज गायकवाडला देखील बाद केले. चेन्नई कर्णधार ऋतुराज गायकवाडला 18 कोटी रुपये देते.
7/9

विघ्नेश पुथूरने चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज शिवम दुबेलाही झेलबाद केले. चेन्नई शिवम दुबेला 12 कोटी रुपये देते.
8/9

दीपक हुडाचा देखील विघ्नेश पुथूरने बळी घेतला. चेन्नई दीपक हुडाला 1.70 कोटी रुपये देते.
9/9

रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या 30 लाखांच्या विघ्नेश पुथूरने चेन्नईच्या एकूण तीन फलंदाजांना बाद केले. या तीन फलंदाजांसाठी चेन्नई एकूण 31.7 कोटी रुपये मोजते.
Published at : 24 Mar 2025 11:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
