कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपो कल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे

कोल्हापूर : स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळावरील कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच, रायगडावरील (Raigad) वाघा कुत्र्याची ही कपोलकल्पित समाधी हटविण्यासंदर्भात संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं. आता, या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असे इंद्रजित सावंत (Indrajit sawant) यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती देखील कुठून झाली यावर त्यांनी भाष्य केलं. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मित्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपो कल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. तसेच, वाघ्या कुत्र्याचं स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजां कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केली आहे, ती योग्यच असल्याचेही इंद्रजीत सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. त्यामुळे, राज्यात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरुन वादंग सुरू असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचाही मुद्दा चर्चेत आला आहे.
कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले. 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
यापूर्वी शिवभक्तांनी हटवली होता पुतळा
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे. या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला आहे. या आधी एकदा शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता. पण प्रशासनाने तो पुन्हा त्या ठिकाणी बसवला. त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षणदेखील आहे. आता संभाजीराजेंनीही पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी ही अलिकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडवरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
