बिल गेट्सशी 3300 कोटींची डील करणाऱ्या बड्या उद्योगपतीशी ऐश्वर्या रायला करायचं होतं लग्न, सलमानकडून जळाला होता त्याचा हात
Aishwarya rai wanted this millionaire businessman to be her husband : अभिनेत्री ऐश्वर्या रायला बड्या उद्योगपतीशी करायचं होतं लग्न...

Aishwarya rai wanted this millionaire businessman to be her husband : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत अफवा पसरताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नाही, दोघ केव्हाही घटस्फोट घेऊ शकतात, असं बोललं जातंय. अनेक रिपोर्ट्समधून दावा करण्यात आलाय की ते घटस्फोट घेतील.
मात्र, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना अभिषेक आणि ऐश्वर्या अनेकदा ट्रॅव्हल करत असताना दिसले आहेत. दरम्यान आपण अशा एका व्यक्तीसोबत जाणून घेऊयात...ज्याच्यासोबत ऐश्वर्या रायला लग्न करायचं होतं. एकेकाळी या व्यक्तीचं उद्योग जगतात मोठं प्रस्थ होतं. या उद्योगपतीने त्याची एक कंपनी 3300 कोटी रुपयांना विकली होती. दरम्यान हा उद्योगपती कोण आहे? जाणून घेऊयात...
कोण आहे सबीर भाटिया?
सबीर भाटिया एक बडे उद्योगपती आहेत. सध्या ते एआय वर काम करत आहेत. याशिवाय ते क्लीन फैनेटिक्सचे सहसंस्थापक आहेत. सबीरने 4 जुलै 1996 आपल्या मित्र जॅक स्मिथ याच्यासोबतीने हॉटमेलची स्थापना केली होती. सबीरने 1998 मध्ये 3300 रुपये किमतीची हॉटमेल ही कंपनी बिल गेट्स यांना विकली होती. सध्या त्या कंपनीला आऊटलूक म्हणून ओळखलं जातं.
ऐश्वर्या रायशी करायचं होतं लग्न
बिल गेट्सला स्वत:ची कंपनी विकणारा सबीर उद्योगपती म्हणून खूर प्रसिद्ध झाला होता. त्याचं नाव अभिनेत्री ऐश्वर्या रायशी जोडलं जात होतं. अनेक मीडिया रिपोर्ट्स सांगतात की, सबीर भाटियाला ऐश्वर्याशी लग्न करायचं होतं.
सबीर भाटीयाने केलं होतं ऐश्वर्याचं कौतुक
सबीर भाटीयाने ताल हा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या रायचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्याने एका मुलाखतीत मान्य देखील केलं होतं की, ऐश्वर्या रायसोबत मला विवाह करायचा आहे.
सलमान खान आणि सबीरची झाली होती भेट
सबीर भाटिया आणि सलमान खान यांची डिसेंबर 2001 मध्ये एका पार्टीदरम्यान यांची भेट झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या राय बड्या उद्योगपतीला डेट करत असल्याच्या अफवा चर्चेत होत्या. पार्टीत एका संभाषणादरम्यान सलमानने साबीरला विचारले, "मग, तू तो माणूस आहेस ज्याला ऐशशी लग्न करायचे आहे?"
सबीरच्या हातावर बसला होता सिगरेटचा चटका
दरम्यान, एका पार्टीत सलमानकडून सबीरच्या हातावर सिगारेट पडली होती. यावर सलमानने माफी देखील मागितली होती. सलमान म्हणाला होती की, "अरेरे, शेवटी 'ऐश' तुमच्या हातात आली".
बॉलिवूडमधील या अभिनेत्रींना डेट केल्याच्या चर्चा
ऐश्वर्या रायशिवाय अमिषा पटेल आणि सुष्मिता सेन यांचीही नावं साबीर भाटियासोबत जोडली गेली होती, पण 9 मार्च 2008 रोजी साबीरने त्याची बालपणीची मैत्रिण तान्या शर्मासोबत लग्न केलं, पण काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
