धक्कादायक! जालन्यात 15 एकरवरील मका आणि गहू पिकाला आग, शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील आलापूर शिवारात उभ्या पिकाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. या आगीत तब्बल 15 एकर क्षेत्रातील मका (maize) आणि गव्हाचं (wheat) पीक जळून खाक झालंय.

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील आलापूर शिवारात उभ्या पिकाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल 15 एकर क्षेत्रातील मका (maize) आणि गव्हाचं (wheat) पीक जळून खाक झालं आहे. विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. ठिबक आणि तुषार सिंचनाच्या पाईप्सही जळाल्याने याचा शेतीसाठी मोठा फटका बसला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच भोकरदन नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र, या आगीत शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक जळून नष्ट झालं आहे. यामुळं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. काढणीस आलेली मका आणि गव्हाचं पिकं जळून खाक झालं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
महत्वाच्या बातम्या:























