IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?; लिलावानंतर एक फोन कॉल अन् इशान किशनच्या आयुष्यात यूटर्न, शतक ठोकताच सर्व सांगितलं!
IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला.

IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा (SRH vs RR) 44 धावांनी पराभव केला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 286 धावा केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वोच्च धावसंख्या आहे. हैदराबादने दिलेल्या या प्रत्युत्तरात राजस्थानने 242 धावा केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी अर्धशतके झळकावले. मात्र त्यांना संघाला विजयी करता आले नाही.
सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशन (Ishan Kishan) याने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. इशान किशनने या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार लगावले. आयपीएल 2025 च्या हंगामात शतक झळकवणार इशान किशन पहिला खेळाडू ठरला आहे. दरम्यान सामना संपल्यानंतर इशान किशनने या शतकामागील एक रहस्य सांगितले आहे.
शतक झळकवल्यानंतर इशान किशन काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर इशान किशनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या स्फोटक फलंदाजीचे रहस्य उलगडले. इशान किशन म्हणाला की, आयपीएलच्या लिलावानंतर मी थेट अभिषेक शर्माला फोन केला आणि विचारले की तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे?, मला मैदानात उतरताच प्रत्येक चेंडू मारावा लागेल का?, यावर अभिषेक म्हणाला, हो, अगदी बरोबर..हेच तुझे काम आहे.
Ishan Kishan said, "I straightaway called Abhishek Sharma after the auction and asked, 'what are you guys expecting? Do I've to hit each and every ball?' he replied, 'absolutely, that is your job". pic.twitter.com/u4pVnHwWVr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2025
सॅमसन आणि जुरेलच्या प्रयत्नांना अपयश-
राजस्थान रॉयल्सना 287 धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरादाखल, जेव्हा यशस्वी जयस्वाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा तो फक्त 1 धाव करून बाद झाला. या सामन्यात, आरआर संघाचे नेतृत्व करणारा रियान पराग देखील केवळ 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संजू सॅमसन इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आला. संजू सॅमसनने 37 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर, ध्रुव जुरेलनेही या सामन्यात आक्रमक खेळी केली. जुरेलने 35 चेंडूत 70 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत जुरेलने 5 चौकार आणि 6 षटकार लगावले.
एका सामन्यात 528 धावा-
राजस्थानने 286 धावा केल्या, तर हैदराबादने 242 धावा केल्या. अशाप्रकारे संपूर्ण सामन्यात 528 धावा झाल्या. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील या सामन्यात दोन्ही संघांनी 51 चौकार आणि 30 षटकार मारले. राजस्थानकडून शेवटच्या षटकांमध्ये शुभम दुबेनेही वादळी खेळी करून संघाचे लक्ष वेधून घेतले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. शुभम दुबेने 11 चेंडूत 34 धावा केल्या.
TOP Headlines 9.30AM 24 March 2025, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

