एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Kunal Kamra: एकनाथ शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा, जनतेमध्ये त्यांना प्रचंड आदर; देवेंद्र फडणवीसांनी कुणाल कामराला फटकारलं, म्हणाले...

Kunal Kamra standup on Eknath Shinde: कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक विडंबनात्मक गीत सादर केले होते. यामध्ये त्यांना गद्दार, दलबदलू अशा उपमा देण्यात आल्या आहेत.

मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीच्या नेत्यांनी कुणाल कामराविरोधात (Kunal Kamra) टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. खरं म्हणजे कामराला माहिती पाहिजे की, महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली, हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याविषयी अशाप्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी जनतेच्या मनात आदर आहे. त्याचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. व्यंग करा पण कोणालाही अपमानित करुन नका. कोणीही अपमानित करण्याचं काम काम केले तर ते सहन केले जाणार नाही. त्यामुळे कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांची माफी मागावी. कुणाल कामरा संविधानाचं जे पुस्तक दाखवत आहेत, ते त्यांनी वाचलेलं नाही. संविधानात लिहलं आहे की, स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता येणार नाही. त्यामुळे कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागितली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मोहित कंबोज यांचा इशारा

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक काव्यानंतर कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. अभी तो सिर्फ स्टूडियो टूटा है , पिक्चर तो अभी बाक़ी है दोस्त. सभी शिव सैनिको को दिल से अभिनंदन और जय श्री राम, असा सूचक इशारा मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

कामरा पाँडिचेरीत, त्याला अटक करायला पोलिसांची मदत घेऊ: प्रताप सरनाईक

खारच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कुणाल कामरा विकृत आहे. संविधानाची प्रत घेऊन तो संविधानाने अधिकार दिल्याचे भासवत आहे. प्रशांत कोरटकर सारखा माणून जर संविधान घेऊन उभा राहिला तर मान्य करणार का? कामरा पाँडिचेरीला पळाला आहे, त्याला अटक करण्यासाठी तिथल्या पोलिसांची मदत घेऊ. आम्ही कुठल्याही तोडफोडीचे समर्थन करणार नाही. मुंबईतील शांत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. कुणाल कामरा याच्यावर गुन्ह्यातील४२७ कलम लावण्यात आले आहे, त्यात अनेक पोट कलमं आहेत, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आणखी वाचा

कुणाल कामराच्या स्टँडअप स्किटमधील कोणत्या चार ओळी शिवसैनिकांना जास्त झोंबल्या? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
उद्धव ठाकरे म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा न्यायालयावर अविश्वास 
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Supriya Sule : महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी कारण सांगितलं; FCRA आणि डिलिमिटेशन विधेयकाबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमचे खासदार पीएम मोदींना भेटणार, सुप्रिया सुळेंनी भेटीचं कारण सांगितलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget