Temperature Update: उन्हाचा चटका तीव्र.. मध्य महाराष्ट्र, विदर्भात गेल्या 24 तासांत 4 ते 5 अंशांनी वाढ, कुठे कसे राहणार तापमान? वाचा IMDने सांगितलं..
Temperature today: प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात वाढ होणार आहे.

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा जाणवत आहेत. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 40 वर पोहोचले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी होत आहेत. गेल्या 24 तासांत तापमानात मोठा बदल जाणवत असून साधारण 4 ते 5 अंशांनी तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 35.8 अंश सेल्सियसवर होता. तर ठाण्यात 36.6 अंश तापमानाची नोंद झाली. सांगलीत 37.1 अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद होतेय.हवामान विभागाच्या अंदाजानुसार,येत्या 3-4 दिवसांत तापमान चढेच राहणार असून उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. (Temperature)
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे पुढील 7 दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. एक पश्चिमी चक्रावात(Western Disturbance) पाकिस्तान व त्याच्या शेजारील भागावर चक्रीय स्थितीच्या स्वरूपात आहे आणि दुसरीकडे चक्राकार वाऱ्यांची स्थिती वायव्य राजस्थानमध्ये स्थित आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत राज्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा प्रभाव अधिक जाणवेल. सध्या उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा नाही, मात्र उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत जाईल.
विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद
विदर्भात गेल्या 24तासांत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत असून उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय.हवामान विभागाचे पुणे विभाग प्रमुख के. एस होसाळीकर यांनी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाच्या नोंदी झाल्या, याविषयी x माध्यमावर पोस्ट केली आहे. त्यानुसार, 18 फेब्रुवारीला अकोल्यात सर्वाधिक म्हणजेच 37.8 अंश सेल्सियसची नोंद झाली. ब्रम्हपुरीतही साधारण असेच तापमान होते. अमरावतीत 36.4 अंश सेल्सियस तापमान होते. वाशिम जिल्ह्याचा पारा 37 अंशांवर गेला होता. तर चंद्रपूर,भंडारा,गोंदिया, गडचिरोली, वर्धा,यवतमाळ या जिल्ह्यांचा पारा 35 - 37 अंशांपर्यंत गेला होता. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागानुसार, विदर्भात दोन दिवसांनी काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाचीही चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात सांगली 37.1 Klp 35.1 सातारा 35.3 Slp 37.5 परभणी 36.5 नाशिक 35.7 बारामती 34.4 उदगीर 35.4 पुणे 35.8 जालना 36.2 ठाणे 36.6337 जेऊरगाव 35.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.
18 Feb Tmax 35+ Maharashtra
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 18, 2025
Sangli 37.1
Klp 35.1
Satara 35.3
Slp 37.5
Parbhani 36.5
Nashik 35.7
Baramati 34.4
Udgir 35.4
Pune 35.8
Jalna 36.2
Thane 36.6
Dharashiv 34.7
Jeur 37
Malegao 35.2 pic.twitter.com/m3JYSYYKWF
उष्ण झळांसह तापमान वाढणार
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात वाढ होणार आहे. विशेषतः दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान १ ते २ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही. विदर्भात मात्र पुढील पाच दिवस कमाल तापमान स्थिर राहील. किमान तापमानातही पुढील तीन दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमान 2 ते 3 अंशांनी घटू शकते. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील किमान तापमान पुढील तीन दिवसांपर्यंत स्थिर राहील. मात्र, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 1ते 2 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
Maharashtra Weather: मुंबईतील तापमानात प्रचंड चढउतार, यंदाचा उन्हाळा भयंकर? हवामान खात्याचा इशारा


















